आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:राज्यातील वसतिगृहे​​​​​​​ आणि निवासी शाळा सोमवारपासून सुरु होणार, नियमांचे पालन करणे बंधणकारक

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना नियमांचे पालन करुन राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध मुलांमुलींच्या शासकीय निवासी शाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृहे व अनुदानित वसतिगृहे सोमवारपासून सुरु करण्याच्या सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या घटल्यानंतर राज्यातील शहरी भागातील आठवी ते बारावी व ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन विभागाअंर्गत असेल्या अनुसूचित जाती, नवबौद्ध मुल, शासकीय निवासी मुलींची, अनुदानित आश्रमशाळा, निवासी शाळा, डकर योजनेतील फुले, आंबेडकर, शाहू, शासकीय वसतिगृहे, अनुदानित वसतिगृहे सोमवार दि 4 सप्टेंबर पासून सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महाविद्यालये प्रत्यक्ष सुरु करण्याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही. ही बाब विचारात घेता शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांनी प्रवेश घेतलेल्या शाळा, महाविद्यालये प्रत्यक्ष सुरु झाल्याची खातरजमा करण्याच्या सूचना विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.

स्वच्छतेबाबत अशा आहेत सूचना -
- शाळेतील वर्गखोल्या, नेहमी स्पर्श होणारा पृष्टभाग, वसतिगृहे वारंवार स्वच्छ व निर्जंतुकीकरण करावे
- शाळा, वसतिगृहातील सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मदत घ्यावी

विभागाअंतर्गत येणाऱ्या शाळा, वसतिगृहे
-अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शाळा : १९
- मुलींच्या शासकीय निवासी शाळा : ९०
- अनुदानित आश्रमशाळा : ४४१
- निवासी शाळा : ३२२
- फुले, आंबेडकर, शाहु, शासकीय वसतिगृहे व अनुदानित वसतिगृहे : २३८८

बातम्या आणखी आहेत...