आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:मराठवाडा साहित्य संमेलनातून दिला जाणार पर्यावरण संवर्धनाचा संदेश, पाहुण्यांचा सन्मान 250 फळबिया असणारी सीडबॅग भेट देऊन होणार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या नियमांचे होणार काटेकोर पालन, मास्कशिवाय सभागृहात प्रवेश नाही- डॉ. चेतना सोनकांबळे यांची माहिती

४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात सहभागी होणारे साहित्यिक, कवी, विचारवंत आणि प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करतांना २५० फळबिया असणारी सीडबॅग भेट दिली जाणार असल्याची माहिती आयोजक समितीच्या उपाध्यक्ष डॉ. चेतना सोनकांबळे यांनी दिली.

लोकसंवाद फाउंडेशनतर्फे २५ व २६ रोजी मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृह, औरंगाबाद येथे केले आहे. या संमेलनातून पर्यावरणाचा संदेश देण्याची संकल्पना आयोजक समितीचे सहकार्यवाह डॉ. कैलास अंभुरे यांनी मांडली. यानुसार हिंगोली जिह्यातील निसर्गशाळा उपक्रम राबविणारे पर्यावरण प्रेमी शिक्षक अण्णा जगताप यांनी पाहुण्यांना देण्यासाठी लागणाऱ्या बिया पुरविण्यास संमती दर्शविली. यानुसार पाहुण्यांना देण्यात येणाऱ्या सीडबॅगमध्ये चिंच, रामफळ, सीताफळ, हदगा, आवळा, बिबवा, भद्राक्ष, बेल, गुंज अशा शेकडो प्रकारच्या बिया देण्यात येणार असल्याचे डॉ.सोनकांबळे यांनी सांगितले. या माध्यमातून प्रत्येकाने पर्यावरण संवर्धन करीत वृक्षाची लागवड करावी असा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. तसेच पाहुण्यांना इकोफ्रेंडली बॅग देण्यात येणार असल्याचेही डॉ. सोनकांबळे यांनी सांगितले.

मास्कशिवाय सभागृहात प्रवेश नाही -
संमेलनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. सभागृहात मास्क घातल्या शिवाय प्रवेश देण्यात येणार नाही अशी माहिती स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी दिली. संमेलनासाठी नियोजित दोन्ही व्यासपीठ आणि नाट्यगृहात ठिकठिकाणी निर्जतुकीकरण करण्यासाठी सॅनीटायझर ठेवण्यात येणार आहे. याशिवाय सोशल डिस्टनसिंग पाळण्यासाठी एक खुर्चीमध्ये एक खुर्चीचे अंतर ठेवण्यात येणार असल्याचेही डॉ.करपे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...