आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोषण आहार:शालेय पोषण आहाराचा नाविन्यपूर्ण उपक्रम, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार न्यूट्रिटिव्ह स्लाइस हेल्दी आहार

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलांच्या आहारात पोषण तत्त्वे असणे आवश्यक आहे. परंतु मुलांच्या आवडीनिवडी खाण्याविषयी असलेल्या ठराविक पदार्थांमुळे मुलांना नेमके आहारात काय द्यावे, असा प्रश्न नेहमीच पालकांना सतावत असतो. शाळेतही मुलांचा पोषण चांगले व्हावे यासाठी पोषण आहार सुरु करण्यात आला आहे. आता शालेय पोषण आहाराच्या नाविन्यपूर्ण उपक्रम योजनेअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना न्यूट्रिटिव्ह स्लाईस हेल्दी आहार देण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी व सोयाबीनचे मूख्य घटक असलेला हेल्दी आहार आठवड्यातून पाच दिवस वाटप करण्याच्या सूचना प्राथमिक संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिल्या आहेत.

शालेय पोषण आहार पात्र असलेल्या शासकीय जिल्हा परिषद, मनपा, नपा, शासकीय व कटक मंडळ शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या या योजनेसाठी मागविण्यात आली आहे. त्यानुसार तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, सोयाबीन यासह लोहयुक्त गव्हाचे पीठ, पीठीसाखर, खाद्यतेल, स्किम्ड दूध आणि इतर पोषक घटक वापरून ही न्युट्रीटीव्ह स्लाईस बनविण्यात आली असून आकर्षक पद्धतीने सीलबंद पाकिटातून या शाळांमधील विद्यार्थ्यांना वाटप केले जाणार आहे. शाळांनी पुरवठादाराकडे मागणी केल्यानंतर दोन महिन्यांच्या आत स्लाईसचा पुरवठा होणे बंधनकारक असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे जे मुलं घरात मॅगी फूड तयार करुन देण्याचा आग्रह धरतात, त्यांना शाळेतूनच हा आहार दिला जाणार आहे.

याबाबतची ई-निविदा प्रक्रिया राबवून न्युट्रीटीव्ह स्लाईस बनविण्याचे कंत्राट जालना येथील दिव्या एस.आर.जे.फूड्स एलएलपी या संस्थेला देण्यात आले आहे. दैनंदिन आहारात मुलांना विविध जीवनसत्व घटकांची गरज असते. नवीन पोषण आहारातील या बदलांमुळे मुलांना वैशिष्टयपूर्ण पौष्टिक आहार मिळेल. परंतु सदरील आहार दर्जेदार असला पाहिजे. पुरवठेदारांनी एक महिनाभर पुरेल एवढाच आहार पुरवावा जेने करुन शाळांमध्ये खरात होणार नाही. अशी माहिती कैलास गायकवाड शिक्षक जि.प. प्राथमिक शाळा खांडी पिंपळगाव यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...