आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:उद्यापासून रात्री आठनंतर संचारबंदी; या गोष्टीना मिळणार सूट

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रुग्णसंख्या आटोक्यात येणे कठीण होत असल्याने १९ मार्चपासून जिल्ह्यात रात्री आठ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. या निर्णयाची कडक अंमलबजावणी होईल. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा दावाही त्यांनी केला. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या वतीने हे आदेश काढण्यात आले आहेत. यापूर्वी रात्री अकरा आणि त्यानंतर नऊ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली होती. चव्हाण म्हणाले की, अनेक लोक गल्लीबोळात अनावश्यक गर्दी करत आहेत. काम नसताना भटकत तसेच गप्पांचे अड्डे जमवत आहेत. त्यामुळे संचारबंदी लागू केली आहे.

यांना मिळणार सूट
संचारबंदीच्या निर्णयातून वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र, उद्योग, कारखाने, दूध विक्री, पेट्रोल-गॅस एजन्सी, बांधकामे, बँकांना सूट मिळणार आहे. या क्षेत्राशी संबंधित लोकांवर कारवाई होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...