आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान अंतर्गत जिल्ह्यातील निजाम कालीन माध्यमिक व प्राथमिक शाळांची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. खरं तर शिक्षण विभागाच्या नियमानुसार शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच शाळा दुरुस्ती करायला हवी. मात्र आम्ही विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करुनच ही दुरुस्ती केल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात 81 शाळांमधील 173 वर्गखोल्या पुनर्बांधणी कामे व 130 शाळांमधील दुरुस्ती कामासाठी राज्य शासनाने प्राथमिक स्वरूपात मोठ्या बांधकामासाठी 5 कोटी 60 लाख तर छोट्या कामासाठी 3 कोटी 38 लाख 15 हजार असे एकूण 8 कोटी 87 लाख 69 हजार रुपये निधीची तरतूद केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील 81 शाळांमधील 173 वर्गखोल्यांची मोठी बांधकामे मंजूर आहेत. त्यापैकी 20 टक्के लोकसहभाग प्राप्त 22 शाळांमधील 42 वर्गखोल्यांचे बांधकाम सुरू झालेले आहे. उर्वरित दुरुस्तीच्या कामांचे प्रस्ताव प्राप्त होत आहेत. तसेच 130 शाळांमधील वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे कामे मंजूर आहेत. यामध्ये 39 शाळांचे 20 टक्के लोकसहभागाचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.
तेथील दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच जसजसे प्रस्ताव दाखल होत आहेत, त्याप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी करून दुरुस्तीच्या कामाला परवानगी दिली जात आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.