आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील २० वर्षांपासून रेंगाळलेल्या पैठण-औरंगाबाद रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पुढील महिन्यांत सुरू हाेईल. रस्त्यालगतचे अतिक्रमण हटवण्याची माेहीम हाती घेण्यात आली आहे. ते काम पूर्ण झाल्यावर चाैपदरीकरणाला सुरुवात हाेणार असल्याचे नॅशनल हायवेचे अभियंता अजय पाटील यांनी सांगितले.
४९० कोटींची निविदा असताना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या बंधूंनी केवळ २८९ कोटीतच ठेका घेतला. एवढ्या कमी खर्चात दर्जेदार रस्ता कसा हाेऊ शकेल, असा प्रश्न राजकीय वर्तुळातूनही उपस्थित झाला. यात ४२ किमी लांबीचे चौपदरीकरण होणार असून ३० मीटर रुंदीच्या रस्त्यात ७ मीटरमधून औरंगाबादसाठी जलवाहिनी आहे. हे ७ मीटर वगळता १७ मीटरमध्ये चौपदरीकरण होणार आहे. यात दोन्ही बाजूंनी साडेआठ मीटरचा रस्ता असणार आहे. एक मीटरचे दुभाजक, तर दोन मीटरचे दोन्ही बाजूंनी साइड पंखे असणार आहेत. चौपदरीकरणाचे काम लवकर सुरू करून वेळेत करावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.