आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा संकुल:औरंगाबादच्या खेळाडूंचे 5 सुवर्णांसह वर्चस्व

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशन व एसव्हीजेसिटी क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने डेरवण (चिपळूण) येथे आयोजित दोनदिवसीय राज्यस्तरीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत पहिल्या दिवशी ज्युनियर गटात औरंगाबाद व जालन्याच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व राखले. औरंगाबादच्या युवा खेळाडूंनी विविध गटांत एकूण ५ सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले. शनिवारी (दि.१२) उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेत राज्यभरातून नॅशनल डेव्हलपमेंट, एज ग्रुप, ज्युनियर गट व सीनियर गट या गटांमध्ये एकूण ३५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.

या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन डॉ. शत्रुंजय कोटे यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी राज्य संघटनेचे सचिव डॉ. मकरंद जोशी यांची उपस्थिती होती. स्पर्धेत सांघिक प्रकार औरंगाबाद संघ १४.८६ गुण (प्रथम), पिंपरी-चिंचवड संघ १२.२५ गुण (द्वितीय), जालना संघ ११.७० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

विजेते खेळाडू
स्पर् ज्युनियर पुरुष एकेरी - अद्वैत वझे (औरंगाबाद), अनुराग देशमुख (जालना), साईदीप राजेश्वर (हिंगोली), महिला एकेरी - राधा सोनी (औरंगाबाद), वृंदा सुतार (पिंपरी-चिंचवड), अस्मिता घुगे (हिंगोली). मिश्र दुहेरी - अनिकेत चौधरी व गौरी ब्राह्मणे (औरंगाबाद), साईदीप राजेश्वर व अस्मिता दिलीपराव (हिंगोली), विश्वेश जोशी व श्रेया लोंढे (जालना). तिहेरी गट - विश्वेश पाठक, राधा सोनी व अनिकेत चौधरी (औरंगाबाद), पारिजा क्षीरसागर, निधी असाहे व वृंदा सुतार (पिंपरी-चिंचवड).

बातम्या आणखी आहेत...