आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Aurangabad Positive Story Updates: On A Ventilator For A Month, Then Removed On Oxygen For 15 Days; 51 year old Krishna Broke Karona's Vicious Cycle!; News And Live Udpates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कहाणी एका जिद्दीची:महिनाभर व्हेंटिलेटरवर, नंतर 15 दिवस ऑक्सिजनवर काढले; मात्र प्रबळ इच्छाशक्ती अन‌ डाॅक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे 51 वर्षीय कृष्णाने भेदले कारोनाचे दुष्टचक्र !

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दडपण खूप हाेते, पण एकदाही डगमगलाे नाही : कृष्णा धायगुडे

काेराेनाचा कहर वाढताेय, राेज बळींचे अाकडेही वाढत अाहेत. त्यातच अाॅक्सिजन-इंजेक्शनच्या टंचाईच्या बातम्यांनी सर्वसामान्यांच्या उरात अक्षरश: धडकी भरतेय. रुग्णालयातील वातावरण पाहूनच अनेक रुग्ण व त्यांचे नातलग घाबरून जात अाहेत. मृत्यूच्या बातम्या एेकून काही रुग्ण प्रचंड धास्तावलेले अाहेत. मात्र ‘सर्वकाही हाताबाहेर गेलंय’ असं वाटण्याइतकीही काही वाईट परिस्थिती नाही. डाॅक्टर शर्थीचे प्रयत्न करतच अाहेत, मात्र रुग्णाची इच्छाशक्ती दांडगी असेल तर कितीही गंभीर प्रकृती झाली तरी या संकटावर मात करणे शक्य असल्याचा अनुभव कृष्णा धायगुडे व त्यांच्या पत्नी कांता यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितला. तब्बल ५७ दिवस अायसीयूत उपचार, त्यापैकी ३० दिवस व्हेंटिलेटरवर, नंतर घरी अाल्यावर १५ दिवस अाॅक्सिजनवर असलेल्या कृष्णा ५१ वर्षीय यांनी डाॅक्टरांवरील विश्वास व जिद्दीच्या जाेरावर काेराेनावर मात केली. मूळचे साताऱ्याचे धायगुडे कुटुंब नोकरीनिमित्त ३० वर्षांपूर्वी औरंगाबादेत स्थायिक झाले. कृष्णा धायगुडे गुडइयर कंपनीत आहेत. पत्नी कांता, मुलगा अाशिष व विवाहित मुलगी (सध्या पुण्यात) असा हे चाैकाैनी परिवार.

पत्नी कांताबाई सांगत होत्या, ‘१७ जानेवारीला कृष्णा यांना ताप आला. अाठ दिवस वाळूजमधील डॉक्टरांकडून उपचार घेतले. पण फरक पडला नाही. प्रकृती अधिकच खालावली. तेव्हा आम्ही शहरातील रुग्णालय पालथी घातली. कुणीही अॅडमिट करून घेण्यास तयार नव्हते. शेवटी २५ जानेवारीला एमजीएममध्ये बेड मिळाला. २६ जानेवारीला व्हेंटिलेटरची गरज पडली. अाता सगळेच संपले या भावनेने अाम्ही घाबरलाे. मन चिंती ते वैरी न चिंती असे म्हणतात ना... काेणत्याही क्षणी मृत्यूची बातमी येऊ शकते, अशी भीती वाटत राहायची. आमचे सगळे नातेवाईक वाई आणि साताऱ्यात. मुलगा फक्त २२ वर्षांचा. मला पायाचा त्रास असल्याने मी कुठे धावपळ करू शकत नव्हते. मुलगा अाशिष रोज सकाळ-संध्याकाळ वाळूजहून एमजीएमला जायचा. डॉक्टरांकडून रोज वडिलांच्या प्रकृतीची माहिती घ्यायचा. थाेडा वेळ रुग्णालयाबाहेरच थांबून परत यायचा अन‌् मला वृत्तांत सांगायचा.

दिवसामागून दिवस जात होते, पण प्रकृतीत सुधारणा जाणवत नव्हती. आम्ही सगळ्यांनी आता अाशा सोडली होती. पण डॉ. प्रदीप तोर, डॉ. रोहन गुंडरे आणि डॉ. आनंद निकाळजे यांनी प्रयत्न साेडले नव्हते. त्यांच्यावर अामचा विश्वास हाेता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे महिनाभराने म्हणजेच २७ फेब्रुवारीला व्हेंटिलेटर काढण्यात अाले. अाणखी पाच दिवस अायसीयूत व नंतर जनरल वॉर्डात आले. ५७ दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. अर्थात, तेव्हाही प्रकृती फारशी उत्तम नव्हती. घरी १५ दिवस ऑक्सिजन लावून ठेवले होते. डॉ. निकाळजे यांनी ते उपलब्ध करून दिले. यानंतर मात्र प्रकृती सुधारत गेली व अाता हे ठणठणीत झाले अाहेत.’

दडपण खूप हाेते, पण एकदाही डगमगलाे नाही : कृष्णा धायगुडे
मृत्यूशी झुंज देत काेराेनावर विजय मिळवणारे ५१ वर्षीय कृष्णा धायगुडे म्हणाले, ‘अतिदक्षता विभागात ३० दिवस असताना माझ्यावर प्रचंड दडपण यायचे. तिथे रोज कुणाचा ना कुणाचा मृत्यू होताना मी पाहत होतो. पण डगमगलो नाही. घाबरलो नाही. कारण घाबरलाे असताे तर सगळेच संपले असते. आपण मानसिकरीत्या बळकट असलो तरच सामना जिंकता येईल ही खूणगाठ बांधली होती. त्याचा फायदा झाला.

बातम्या आणखी आहेत...