आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:औरंगाबादेत प्राध्यापक डॉ. राजन शिंदेंचा खून; गळा, हातांच्या नसा कापल्या, कान कापत डोक्यातही हातोड्याने वार

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. राजन हरिभाऊ शिंदे (५१, रा. संत तुकोबानगर, एन-२, सिडको) यांची रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घरात गळा, दोन्ही हातांच्या नसा कापून हत्या करण्यात आली. मारेकऱ्याने कान कापत त्यांच्या डोक्यातही हातोड्याने वार केले. माहिती मिळताच पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिंदेंच्या पत्नी, मुलगा, मुलीची साडेचार तास कसून चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झाली नसली तरी संशयाची सुई शिंदे कुटुंबीयांभोवतीच फिरत आहे.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सचिव म्हणून डॉ. शिंदे यांनी २००९मध्ये प्रा. डॉ. गोपाल बछिरे यांच्या नेतृत्वात काम सुरू केले होते. ५ वर्षांपूर्वी त्यांनी आन-बान-शान आणि अडीच वर्षांपूर्वी उधमसिंग ब्रिगेड संघटना स्थापन केली होती. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक वर्तुळातील बहुचर्चित व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पत्नी मनीषा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उस्मानाबाद उपकेंद्रात प्राध्यापक आहेत. त्यांना चैताली, रोहित ही मुले आहेत. रोहित नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. चैतालीही एका महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. मनीषा ८ ऑक्टोबर रोजी उस्मानाबादेतून औरंगाबादेत आल्या. विद्यापीठात अधिसभा बैठकीला उपस्थित राहिल्या. रविवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेसाठी त्यांची छावणीतील एका कॉलेजमध्ये नियुक्ती झाली होती. त्यामुळे त्यांनी सोमवारची सुटी घेऊन मंगळवारी उस्मानाबादला जाण्याचे ठरवले होते.

सकाळी प्रा. शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले
मनीषांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शिंदे कुटुंबीयांनी जेवण केले. सासरे हरिभाऊ, सासू चंद्रकला झोपी गेले. तर मनीषा मुलांसोबत टीव्ही पाहत होत्या. त्याआधीच डॉ. राजन मित्राला भेटण्यासाठी बाहेर गेले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास ते बाहेरून जेवण करून आले आणि टीव्ही पाहत बसले. दोन्ही मुले अभ्यासासाठी आपापल्या खोल्यांत गेली. एक वाजेच्या सुमारास मनीषाही झोपण्यास गेल्या. सोमवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास मनीषा झोपेतून उठल्या. तेव्हा त्यांना शेजारी मुलगी दिसली नाही. रोहितही बेडरूममध्ये नव्हता. त्यामुळे त्या बैठक खोलीत गेल्या. तेथे राजन रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

बातम्या आणखी आहेत...