आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:ऊसतोडीसाठी छावाची निदर्शने  औरंगाबाद

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऊस तातडीने तोडून न्या, अन्यथा हेक्टरी २ लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी करत किसान सभा व अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने सोमवारी दुपारी क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली. तसेच प्रादेशिक साखर कार्यालयावर तुरे फुटलेला ऊस हाती घेऊन मोर्चा काढण्यात आला.

हंगाम संपत आला तरी मराठवाड्यात ४० टक्के ऊस उभा आहे. संकटात सापडलेल्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. कारखान्यांनी ऊस त्वरित तोडून न्यावा, अथवा सरकारने हेक्टरी २ लाख भरपाई द्यावी, एफआरपी प्रमाणे बिल अदा करावे, ३१ मार्चनंतर गाळप केलेल्या सर्व उसाला प्रतिटन ५०० रुपये नुकसान भरपाई द्यावी, वाहतूक खर्च बिलातून वसुल करू नये, व्याजमाफीची सवलत मिळावी आदी मागण्यांचे निवेदन साखर उपसंचालक एस. एम. स्वामी यांना देण्यात आले.

रास्ता रोकोचा प्रयत्न
छावा संघटनेने क्रांती चौकात दोन मिनिटे रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. नंतर तुरे फुटलेला ऊस, भगवे झेंडे घेऊन साखर कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या वेळी नानासाहेब जावळे पाटील, भीमराव मराठे, पंजाबराव काळे, बालाजी सूर्यवंशी, अप्पासाहेब कुढेकेर, संतोष जेधे, डॉ. गोविंद मुळे, अशोक मोरे, किशोर शिरावत, शिवाजी मारकंडे, किसान सभेचे उमेश देशमुख, दीपक लिपने, अजय बुरांडे, भगवान भोजने, डॉ. भाऊसाहेब झिरपे, गोविंद आर्दड, लिंबाजी पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...