आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद-पुणे ग्रीनफील्ड मार्ग:जिल्ह्यातील 24 गावांचे भूसंपादन, 65 किमी मार्गासाठी राजपत्र प्रसिद्ध

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नगर - पुणे ग्रीनफील्ड महामार्गासाठी औरंगाबाद जिल्ह्याचे राजपत्र अखेर प्रसिद्ध झाले आहे. त्यामध्ये औरंगाबाद तालुक्यातील सात आणि पैठण तालुक्यातील १७ अशा एकूण २४ गावांतून हा रस्ता जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून साधारण ६० ते ६५ किलोमीटर लांबीचा हा रस्ता असेल. राजपत्र प्रसिद्ध झाल्यामुळे आता भूसंपादन अधिकारी नियुक्त केला जाणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रभो मुळे यांनी दिली आहे.

पुणे, नगर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या असून एक जानेवारी २०२३ पासून भूसंपादन करण्याच्या हालचालीदेखील सुरु आहेत. मात्र औरंगाबाद जिल्ह्याच्या भूसंपादनाबाबत राजपत्रदेखील प्रसिद्ध झाले नव्हते. आता औरंगाबाद जिल्ह्यातही लवकरच भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती हाेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पैठण तालुक्यातील १७, औरंगाबादेतील ७ गावे

औरंगाबाद तालुक्यातील पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बी.के.,चिंचोली, घारदोन तर पैठण तालुक्यातील वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, ववा, वरुडी बीके, पाचळगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहांगीर, पाटेगाव, साईगाव, पैठणमधून हा रस्ता जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...