औरंगाबाद, पुणे, नाशिकसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान


  • या पावसामुळे वातावरणात काही काळ थंडावा जाणवत आहे

दिव्य मराठी वेब टीम

Mar 25,2020 06:30:55 PM IST

मुंबई- उन्हाळ्याचा तोंडावर राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावलेली पाहायला मिळाली. पावसाच्या सरींने वातावरणात थोडा थंबवा जाणवला आहे. औरंगाबाद, पुणे, नाशिक, कोल्हापूरसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे.


औरंगाबाद जिल्ह्यातून या पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्यातील पैठण, वैजापूर, कन्नड, सोयगाव या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस, वादळी वाऱ्यासह मुसळधार सरी कोसळल्या. यासोबतच पुण्यात विजेच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसाने सिंहगड परिसरात वीजेचा पुरवठा काही काळासाठी खंडीत झाला होता. सिंहगडसह कात्रज कोंढवा-मुंडवा परिसरातही जोरदार पाऊस आला. तसेच, बीड जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.

इकडे मालेगाव शहरातही मंगळवारी रात्री 12.45 वाजता अर्धा तास जोरदार पाऊस झाला. मध्यरात्रीनंतर पाऊस सुरू झाला, वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यासोबतच बुलडाण्यातही आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाउस पडला. तसेच, नवापूरमध्येही अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावली.


पुण्यानंतर नाशिक शहरातही पावसाने जोरदार जहेरी लावली. नाशिकसह जवळील भागातही पावसाच्या सरी बरसल्या. भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरात अवकाळी पावसाने शेतीचे चांगले नुकसान केले आहे. मुक्ताईनगर येथेही ढगाळ वातावरणासह पाऊस झाला. जालना जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. काही ठिकाणी मेघ गर्जनेसह ढगाळ वातावरण पाहायला मिळाले.

X