आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद ते पुणे विकासाचा नवा मार्ग खुल्या करणाऱ्या ग्रीनफील्ड रस्त्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे सहा महिन्यांपूर्वी केली. त्यासाठी औरंगाबादेत प्रत्यक्ष हालचाली आता सुरू झाल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील २४ गावांतून हा ५५ किलोमीटरचा रस्ता जाणार आहे. त्यात भूसंपादनात जमीन मालकाला रेडीरेकनरच्या चारपट मोबदला मिळणार आहे. म्हणजे एका एकरसाठी रेडीरेकनरचा दर पाच लाख रुपये असेल तर २० लाख रुपये मिळू शकतील.
कृष्णा खोऱ्याचे भूसंपादन अधिकारी राजेश जोशी यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील आठवडाभरात या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिली. भूसंपादनाच्या नियमानुसार खरेदी - विक्रीचा व्यवहार होईल, असेही ते म्हणाले.
औरंगाबाद-नगर पुणे ग्रीनफील्ड रस्त्यासाठीचे औरंगाबाद जिल्ह्याचे राजपत्र प्रसिद्ध झाले आहे. त्यामध्ये औरंगाबाद तालुक्यातील सात आणि पैठण तालुक्यातील सतरा अशा एकूण २४ गावांतून हा रस्ता जाणार आहे. कृष्णा खोऱ्याच्या उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांची बदली झाल्याने हे पद रिक्त होते. त्यावर राजेश जोशी गेल्याच आठवड्यात रुजू झालेे. त्यांच्याकडे भूसंपादनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.समृद्धीच्या काळात एसडीएमकडे म्हणजे उपविभागीय अधिकारी शशांक हदगल यांच्याकडे ही जबाबदारी होती.
एका एकरला सुमारे २० लाख जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार एका एकर जमिनीचा सध्याचा रेडीरेकनर दर पाच लाख रुपये असेल तर त्या जमीन मालकाला २० लाख रुपये मिळणार आहेत. यामुळे हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दलालांचा यात प्रवेश झाला आहे.
२१ दिवसांनी ठरेल मोबदला औरंगाबादमधून ५५ किमी रस्ता जाणार आहे. यासाठी नियुक्त भूसंपादन अधिकारी रस्ता कोणत्या गटातून जातो हे निश्चित करतील. त्यानंतर त्याची जाहिरात प्रसिद्धी केली जाईल. २१ दिवसांच्या कालावधीनंतर अवाॅर्ड (मोबदल्याची रक्कम) जाहीर होतील. त्यानंतर प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
जमीन देणाऱ्या पैठण तालुक्यातील सतरा गावांना होणार फायदा औरंगाबाद तालुक्यातील पिरवाडी, हिरापुर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बी.के., चिंचोली, घारदोन आदी गावांतून हा रस्ता जाणार आहेे. पैठण तालुक्यातील वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, ववा, वरुडी बीके, पाचळगाव, नारायण गाव, करंजखेडा, अखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहांगीर, पाटेगाव, साईगाव, पैठणमधून हा रस्ता जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.