आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Aurangabad Rainfall Yesterday | Marathi News | Cold And Rainfall | Chikalthana Observatory Recorded 1.6 Mm Of Rainfall, While MGM Received 0.8 Mm Of Rainfall

धो-धो:ऐन थंडीत टपोऱ्या थेंबांचा अवकाळी मारा; चिकलठाणा वेधशाळेत 1.6 मिमी, तर एमजीएममध्ये 0.8 मिमी पाऊसाची नोंद

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी दुपारी पावणेपाच वाजेपर्यंत आकाशात ढगांची गर्दी होती. त्यानंतर अर्धा तास धो-धो टपोऱ्या थेंबांचा पाऊस पडला. चिकलठाणा वेधशाळेने १.६ मिमी, तर एमजीएमने ०.८ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेतली आहे. पाऊस सुरू होताच शहरातील अनेक भागात वीज गुल झाली होती.

शीत वारे व द्रोणीय स्थितीने आकाशात ढगांचे आच्छादन, तापमानात कमालीचा चढउतार व काही ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. १७ जानेवारीपर्यंत शीत वाऱ्याचा जोर कायम राहणार आहे. पश्चिम व उत्तरेकडील अति शीत वारे आपल्याकडे दाखल होत आहेत. याचबरोबर हवेच्या दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी आकाशात शीत व बाष्पांचा संगम होऊन ढगांची गर्दी होत आहे. काही ठिकाणी वादळी वारे व मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस, गारपीट होत आहे. औरंगाबादेत अर्ध्या तासात धो-धो पाऊस पडला. अचानक आलेल्या टपोऱ्या थेंबांच्या पावसाने पतंग उत्सवावर गदा आणली.

तापमान ४ अंशांनी घसरले : पश्चिम-उत्तरेतील शीत वाऱ्यांचा वेग वाढला आहे. समुद्रावरून वाहून आलेल्या बाष्पांचा आकाशात संगम होऊन ढगांची चादर पसरत आहे. यामुळे सूर्यदर्शन दुर्लभ होत आहे. कमाल तापमानात ४ अंशांनी घसरण होऊन ते शुक्रवारी २५.४ अंश, तर किमान २ अंशांनी वाढून १३.९ अंशांवर होते. अति शीत वाऱ्यांमुळे दिवसभर अंगाला झोंबणारा गारठा जाणवतो आहे. ढगांचे आच्छादन, पाऊस, उकाडा, गारपीट, शीत वारे, उष्णता अशा बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या तक्रारीत वाढ होत आहे.

गतवर्षी १३.९ मिमी पाऊस : गतवर्शी जानेवारी महिन्यात १३.९ मिमी पाऊस पडला होता. यंदा १.६ मिमी पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. ढगांची गर्दी व तुरळक ठिकाणी पाऊस व गारपीट होत आहे. १७ जानेवारीपर्यंत असेच वातावरण राहील, अशी माहिती एमजीएम वेधशाळेचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

पुढील पाच दिवस असे राहील हवामान
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ ते ढगाळ राहील. कमाल तापमान २६ ते ३१ अंश सेल्सियस, तर किमान १४ ते १८ अंश सेल्सियस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ८५, दुपारची आर्द्रता ३५ ते ६५ टक्के राहील. वाऱ्याचा वेग ताशी ४ ते १५ किमी प्रती तास राहील.

बातम्या आणखी आहेत...