आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तरेतील अतिशीत वाऱ्याने यंदाच्या हिवाळ्यात शुक्रवारी किमान तापमान 7.9अंश सेल्सियसवर निचांकी पातळीवर घसरले होते. शनिवारी(10 डिसेंबर) त्यात आणखी 0.4 अंश घसरण होवून ते 7.5 अंश म्हणजे सर्वात कमी तापमानाची नोंद चिकलठाणा वेध शाळेने घेतली आहे. अतिशीत वाऱ्यांनी हुडहुडी तर भरली आहे. याच बरोबर नैऋत्य बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या मॅन डौस चक्रीवादळाचाही धोक निर्माण झाला आहे. अतिवेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.
हवामानात वेगाने व अनपेक्षित बदल होत आहेत. परिणामी तापमानातही कमालीचे चढउतार होत आहेत. 1 व 2 डिसेंबरला तापमानात घसरण होऊन ते 14 अंशवरून 10.8 अंशवर खाली आले होते. त्यात पुन्हा वाढ होऊन ते 17.4 अंशांवर गेले होते. यामुळे उत्तरेतील अतिशीत वारे खेचून आणण्यासाठी मदत झाली. परिणामी 9 डिसेंबरला किमान तापमान पारा 7.9 तर 10 डिसेंबरला तो 7.5 अंश सेल्सियवर निचांकी पातळीवर नोंद झाली. 2015 नंतर प्रथमच डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सलग दोन दिवस सर्वात कमी तापमान राहण्याचा विक्रम झाला आहे. अंगाला बोचणाऱ्या तीव्र गारव्यामुळे सायंकाळ ते सकाळी 9 वाजेपर्यंत बाहेर पडणे कठीण झाले आहे.
जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
भारतीय हवामान विभागाच्या (9 डिसेंबर) पूर्वसुचना नुसार नैऋत्य बंगालच्या उपसागरावर मॅन डौस चक्रीवादळ गेल्या सहा तासांमध्ये 10 किमी प्रतितास वेगाने वायव्य दिशेला केंद्रस्थानी आहे. दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरावरील पंडुचेरीच्या किनाऱ्यापासून जवळजवळ वायव्येकडे सकुन 75 ते 85 किमी प्रतितास वेगाने उत्तर तामिळनाडू ओलांडण्याची दाट शक्यता आहे. यामुळे 10 डिसेंबर पासून पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रातील औरंगाबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानुषांगाने जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांनी सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी पिके मळणी कापणीसाठी तयार असतील तर पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावित.
फळे भाजीपाला सरक्षित ठेवणी करावी. जनावरे देखील सुरक्षित ठिकाणी बांधावेत. अतिवृष्टीमुळे सकल भागात काही प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे. ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असताना नागरिकांनी बाहेर पडणे टाळावे. खुल्या, मोकळ्या भागात थांबू नये. विजेचे खांब, झाडाखाली उभे राहु नये. विद्युत उपकरणांपासून दूर रहावे, मच्छिमारांनी मासेमारीसाठी तलाव अन्यथा नदीत जावू नये. शेतकऱ्यांनी शेतीकाम करणे टाळून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे आवाहन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.