आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवाल केव्हा?:छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय लाभासाठी MIM आणि BJPच्या माध्यमातून दंगल घडवली- नसीम खान

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

किराडपुरा दंगल प्रकरणात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी केली आहे काँग्रेसच्या वतीने याबाबत राज्यपालांची देखील भेट घेण्यात आली असून याबाबत राज्यपालांकडे मागणी करण्यात आली आहे. तसेच किराडपुरा दंगल होवून एक महिना तीन दिवस झाले तरीदेखील या दंगलीचा अहवाल अजूनही आलेला नाही त्यामुळे नसीम खान यांनी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांची भेट घेतली.

पोलिस आयुक्तांना निवेदन

यावेळी एमआयएम आणि भाजप यांच्या माध्यमातूनच दंगल घडली असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. नसीम खान यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर मागण्यांची निवेदन पोलिस आयुक्तांना दिले त्यानंतर सुभेदारी विश्रामृहात पत्रकार परिषद घेत त्यांनी सत्ताधारी पक्षांवर ती हल्लाबोल केला.

महिना उलटूनही अहवाल नाही

एक महिना झाला तरी अहवाल नाही यावेळी नसीम खान म्हणाले की ही दंगल घडून एक महिना आणि तीन दिवस झाले आहेत मात्र अजूनही या दंगली बाबतचा अहवाल पोलिसांनी सादर केलेला नाही. या प्रकरणात दंगलीच्या पूर्वी महिन्याभरात छत्रपती संभाजी नगर शहरात जातीय वातावरण तणाव निर्मिती करण्यात आली अनेक भडकाऊ सभांच्या माध्यमातून भाषणबाजी करण्यात आली मात्र या भडकाऊ भाषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असताना देखील कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. पोलिसांनी याबाबत हलगर्जीपणा दाखवला. त्यावेळेसच कारवाई झाली असती तर पुढचा प्रकार टाळला असता असे मत नसीम खान यांनी व्यक्त केले.

राजकीय फायद्यासठी घडवली दंगल

नसीम खान म्हणाले की छत्रपती संभाजी नगर शहरातील दंगल केवळ राजकीय फायद्यासाठी घडवण्यात आली आहे. एमआयएम आणि भाजपच्या माध्यमातून ही दंगल घडवून आली असल्याचा आरोप नसीम खान यांनी केला आहे. तसेच पोलीसच पोलिसांची चौकशी करणे शक्य नाही त्यामुळे न्यायाधीशाच्या माध्यमातून ही चौकशी करणे गरजेचे असल्याचे मत खान यांनी यावेळी व्यक्त केले.