आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस स्पर्धा:औरंगाबाद ग्रामीण संघाला सर्वसाधारण विजेतेपद

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या ३४ व्या औरंगाबाद परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये औरंगाबाद ग्रामीण पोलिस संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. औरंगाबाद शहर संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत औरंगाबाद ग्रामीण, जालना, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद शहर अशा ५ संघातील ५१४ खेळाडूंनी १६ क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या.

या स्पर्धेत पुरुष गटात औरंगाबाद ग्रामीण संघाने १८२ गुण मिळत प्रथम क्रमांक पटकावला. औरंगाबाद शहर संघाने १३८ गुण, बीड संघाने ११३ गुण, जालना संघाने ७५ गुण, उस्मानाबाद संघाने ३९ गुण मिळवले. दुसरीकडे, महिला गटात औरंगाबाद ग्रामीणने १६२ गुण, औरंगाबाद शहरने १२८ गुण, बीडने २८, जालन्याने २६ आणि उस्मानाबादने १७ गुणांची कमाई केली. स्पर्धेचा समारोप गोकुळ मैदान, ग्रामीण पोलिस मुख्यालय येथे पार पडला. विजेत्या खेळाडूंना ऑलिम्पियन अविनाश साबळे, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक मा. के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. रियाज, अनुराधा ठरले सर्वोत्कृष्ट खेळाडू : या स्पर्धेत औरंगाबाद शहर संघाचा रियाज शेख पुरुष गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू व महिला गटात जालना संघाची अनुराधा ठोंबरे सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली.

बातम्या आणखी आहेत...