आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:20 डिसेंबरपासून औरंगाबाद शहरातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू होणार

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरी तसेच ग्रामीण भागातील आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात पहिली ते सातवीचे वर्गही १ डिसेंबर पासून सुरू झाले आहेत. आता 20 डिसेंबरपासून शहरातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यात येतील, अशी माहिती मनपाचे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी दिली.

कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा सुरू करण्यात आल्या. परंतु पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता. ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे सुरुवातीला १० डिसेंबर आणि नंतर १५ डिसेंबर नंतर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...