आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवरण:धुक्याच्या पांघरुणात औरंगाबाद गारठले, 6 जानेवारीपर्यंत थंडी वाढण्याचा अंदाज

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईशान्येकडून वाढलेले अतिशीत वारे आणि मेघाच्छादित अवकाशामुळे औरंगाबाद शहरावर सकाळ आणि सायंकाळी धुक्याचे दाट आवरण पसरले होते. सकाळच्या तुलनेत सायंकाळची दृश्यमानता ५ किलोमीटरवर आली होती. शहरातील काही परिसरात ती त्याहीपेक्षा कमी झाली होती. वाहनांची गती मंदावली होती. ३४ किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहणारे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे शहर गारठले. ९,१०० मीटरपर्यंत ढगांचे आवरण दाटले होते. ५१ टक्के आभाळ ढगांनी भरलेले राहिले. येत्या २ दिवसांत म्हणजे ६ जानेवारीपर्यंत कमाल तापमान घटण्याचा व थंडी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. छाया : मनोज पराती

बातम्या आणखी आहेत...