आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे शिवसेना आमदार तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्या निवडणूक शपथपत्रातील माहितीमध्ये तफावतीच्या तक्रारीच्या पोलिसांमार्फत चौकशीचे आदेश सिल्लोड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी यासंबंधी याचिका दाखल केली होती.
२०१४ मध्ये अब्दुल सत्तार काँग्रेस, २०१९ मध्ये शिवसेनेकडून आमदार झाले. त्यांनी २०१४, २०१९ च्या शपथपत्रात खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिल्याची तक्रार पुण्याचे डॉ. अभिषेक हरदास आणि सिल्लोडचे महेश शंकरपेल्ली यांनी २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सिल्लोडच्या कोर्टात याचिकेद्वारे केली. १६ फेब्रुवारीच्या सुनावणीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मीनाक्षी धनराज यांनी सीआरपीसी कलम २०२ अंतर्गत सिल्लोड पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी २२ मार्चला आहे.
नोटरीचाही समावेश : शपथपत्राची नोटरी शासन प्राधिकृत नोटरी अधिकारी अॅड. एस. के. ढाकरे यांनी केली. परवाना नूतनीकरण केला नसताना नोटरी केल्याने ते फसवणुकीत सहभागी आहेत. यामुळे याचिकेत त्यांचाही समावेश आहे. सत्तार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेत आहे.
याचिकाकर्त्यांचे सत्तार यांच्यावर नेमके आरोप काय?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.