आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणीचा तीर:साईतील आर्चरी व अ‍ॅथलेटिक्सचे एनसीओई सेंटर आता पुढच्या वर्षीपासून बंद; चार कोच, तीनच तिरंदाज; प्रशिक्षकाविना वर्षभरापासून चार धावपटूंचा सराव

एकनाथ पाठक | औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
​​​​​​​साईमधील याच तिरंदाजी सेंटरवर २०१६-१७ दरम्यान पॅराआर्चरी शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात आंतरराष्ट्रीय तिरंदाज सहभागी झाले हाेते. - Divya Marathi
​​​​​​​साईमधील याच तिरंदाजी सेंटरवर २०१६-१७ दरम्यान पॅराआर्चरी शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात आंतरराष्ट्रीय तिरंदाज सहभागी झाले हाेते.
  • अडचणीचा तीर : २०२२-२३ च्या सत्रापासून तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स वगळता साईत बाॅक्सिंग, तलवारबाजी, हाॅकी (महिला), वेटलिफ्टिंग व जिम्नाॅस्टिक एनसीओई सेंटर

औरंगाबादच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साई) गतवर्षी तिरंदाजी आणि अ‍ॅथलेटिक्सचे नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स (एनसीओई) प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, या ठिकाणी या दोन्ही एनसीओईमधील चिंताजनक बाब अडचणीची ठरली. यातील तिरंदाजी सेंटरमध्ये चक्क तीन खेळाडू आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी चार प्रशिक्षकांची नियुक्ती झाली. तसेच अ‍ॅथलेटिक्स सेंटरमध्ये चार धावपटू वर्षभरापासून चक्क प्रशिक्षकाविनाच सराव करत आहेत.

याच दयनीय परिस्थितीमुळे आता औरंगाबादच्या साईतील हे तिरंदाजी व अ‍ॅथलेटिक्सचे एनसीओई प्रशिक्षण सेंटर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून आता पुढच्या वर्षीपासून २०२२-२३ दरम्यान हे दाेन्ही सेंटर बंद हाेतील. साईच्या वतीने देशभरातील २२ ठिकाणी एनसीओई सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्राेजेक्टला गतवर्षापासून देशभरात राबवण्यास सुरुवात झाली. यातून औरंगाबादच्या साईमध्येही याची सुरुवात झाली. यात तिरंदाजीसह अॅथलेटिक्स, बाॅक्सिंग, तलवारबाजी, हाॅकी (महिला), वेटलिफ्टिंग आणि जिम्नाॅस्टिक खेळाच्या एनसीओईचा समावेश आहे. मा, यातील दाेन सेंटर आता बंद हेाणार आहेत.

सिंथेटिक ट्रॅक तयार हाेण्यापूर्वी सेंटर बंद
औरंगाबादच्या साईमध्ये अ‍ॅथलेटिक्सच्या १० लेनच्या सिंथेटिक ट्रॅकला मंजुरी देण्यात आली. यासाठी क्रीडा मंत्रालयाने थेट १३.५४ काेटींचा निधीही मंंजूर केला आहे. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी साईमधील अॅथलेटिक्सचे एनसीओई सेंटर बंद करण्याचे लेटर मिळाले. कारण, हा ट्रॅक तयार हाेण्यास अद्याप वर्षभराचा कालावधी लागणार आहे.

आता महाराष्ट्रीय खेळाडंूची वाताहत
औरंगाबाद साईतील तिरंदाजी व अ‍ॅ​​​​​​​थलेटिक्सचे एनसीओई सेंटर बंद झाल्याने महाराष्ट्रीय खेळाडूंची आता माेठी वाताहत हाेइल. या खेळाडूंना दुसऱ्या राज्यात प्रशिक्षण घ्यावे लागेल. या खेळाडूंना यादरम्यान भाषा व इतरही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. याचा गुणवत्तेला फटका बसू शकेल, असे खेळाडू म्हणतात.

खेळाडूंची संख्या वाढवून औरंगाबादेतील सेंटर कायम ठेवावा : चांदूरकर
औरंगाबादेतील साईमध्येच तिरंदाजीचे प्रशिक्षण सेंटर कायम ठेवण्यात यावे, यासाठीची मागणी करणार आहोत. या सेंटरमुळे महाराष्ट्रातील युवा तिरंदाजांच्या प्रतिभेला चालना मिळत आहे. हे बंद झाल्याचा माेठा फटका राज्याला बसणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून राज्यातील तिरंदाजांना सर्वाेत्तम कामगिरी करता आली. हे राज्यातील एकमेव अत्याधुनिक सुविधा असलेले सेंटर आहे. त्यामुळे हे याच ठिकाणी कायम ठेवण्याची मागणी आम्ही करणार आहोत. तसेच याचा पाठपुरावाही करणार आहोत. प्रमाेद चांदूरकर, महासचिव, तिरंदाजी महासंघ

​​​​​​​
१६ वर्षांपासून तिरंदाजीचे सेंटर; गत वर्षीच एनसीओई
औरंगाबादेतील साईमध्ये तिरंदाजीचे प्रशिक्षण सेंटर हे वर्षापासून हाेते. याच ठिकाणी ऑलिम्पियन तिरंदाजांच्या सराव आणि प्रशिक्षण शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यामुळे हे १६ वर्षांपासून या ठिकाणी असल्याचे म्हटले जाते. गतवर्षी याच तिरंदाजीला एनसीओईचा दर्जा देण्यात आला. यातून सुविधाही वाढवण्यात आल्या हाेत्या. मात्र, याठिकाणी खेळाडूंची संख्या नाही. त्यामुळे यावर गदा आली आहे.

बातम्या आणखी आहेत...