आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाेगस प्रमाणपत्र प्रकरण:मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या; बारगजेच्या घरात प्रमाणपत्रांचा खच! नागपूर पाेलिसांकडून अंकुश व बांगरला अटक

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वीलेखक: एकनाथ पाठक
  • कॉपी लिंक
दिव्य मराठीने ७ सप्टेंबर राेजी बाेगस प्रमाणपत्रे रॅकेटसंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केले हाेते. - Divya Marathi
दिव्य मराठीने ७ सप्टेंबर राेजी बाेगस प्रमाणपत्रे रॅकेटसंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केले हाेते.
  • पांडुरंग बारगजे अद्याप फरार; मेहुणा अटकेत

शासकीय नाेकऱ्यांसाठी बाेगस प्रावीण्य प्रमाणपत्रांचा बाजार मांडणाऱ्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अंकुश राठाेडसह भाऊसाहेब बांगरला अखेर ताब्यात घेण्यात आले. नागपूरच्या मानकापूर पाेलिस ठाण्यातील तपास पथकाने १८ तासांच्या सर्च आॅपरेशननंतर याच्या मुसक्या आवळल्या आहेत. यादरम्यान तपास पथकाने केलेल्या आॅपरेशनमधून पांडुरंग बारगजेच्या घरातून बाेगस प्रावीण्य प्रमाणपत्रांचा माेठ्या संख्येतील साठाही जप्त केला आहे. अंकुशच्या दाेन गाड्यातून पाेलिसांचा बाेर्ड व लाठी जप्त केली आहे. तब्बल ६०० पेक्षा अधिक किमीचा प्रवास करून तपास पथकाने ही माेहिम फत्ते केली. राठाेडच्या अटकेनंतर बाेगस प्रमाणपत्राची पडताळणी करणारे अधिकारीही अटक हाेतील शहानिशा न करता ही प्रमाणपत्रे पास केली आहेत. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार आहे.

रॅकेटमधील आराेपींनाही हाेईल अटक
बाेगस प्रावीण्य प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नाेकरीचा मलिदा लुटणाऱ्यांवर आम्ही कडक कारवाई करणार आहेत. यासाठीच आम्ही हे प्रकरण उघडकीस आणण्याची माेहीम हाती घेतली. मुख्य सूत्रधार अंकुश राठाेडला ताब्यात घेतले आहे. यात सहभागी आणखी काही आराेपींना ताब्यात घेणार आहाेत. कृष्णा शिंदे, पाेलिस निरीक्षक, मानकापूर, नागपूर

प्रमाणपत्रांचा साठा; अनेकांच्या नावाची नाेंद
आैरंगाबाद शहरातील चिकलठाणा परिसरातील नाईकनगर भागात राहणाऱ्या पांडुरंग बारगजेच्या घरामध्ये पाॅवरलिफ्टिंग आणि इतर खेळ प्रकारातील प्रावीण्य प्रमाणपत्रांचा साठा सापडला आहे. मानकापूर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने बारगजेच्या घरावर छापा टाकला. या वेळी सर्व साठा सापडला. यामध्ये अनेकांच्या बाेगस नावाची नाेंद असलेली प्रमाणपत्रे माेठ्या संख्येत सापडली आहेत. पांडुरंग बारगजेने पळ काढला. मात्र, या वेळी घरात असलेल्या साला भाऊसाहेब बांगर (मेहुणा) उपस्थित हाेता. त्यालाही अटक करण्यात आली.

रात्रीपासून दिवसभर आॅपरेशन; रॅकेट उद‌्ध्वस्त
आैरंगाबादेतील रॅकेटचा पर्दाफाशसाठी नागपूरच्या मानकापूर पाेलिस ठाण्यातील पाेलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांचे तपास पथक ६०० पेक्षा अधिक किमीचा प्रवास करून हे पथक रात्री दाेन वाजता शहरात दाखल झाले. १८ तासांत शिंदे यांच्या नेतृत्वात पाेना. संताेष राठाेड, राजेश वर्टी, राघुजी चिलगर, मिलिंद नासरे व हितेश फरकुंड यांनी माेहीम यशस्वी केली.

‘पाेलिस’ सांगून व्यवहार; संघटना विदर्भाची, प्रमाणपत्रे आैरंगाबादेतून
पाेिलसांनी मुख्य सूत्रधार अंकुश राठाेडला एन-९ परिसरातील प्रतापगडनगरातील घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून डस्टर व एक्सयूव्ही महागड्या गाड्याही ताब्यात घेण्यात आल्या. गाड्यांवर महाराष्ट्र पाेलिसांचा फलक लावून राठाेड गाेरखधंदा करत असल्याचे दिसून आले. पाॅवरलिफ्टिंग संघटनेचे काम विदर्भातून चालवले जाते. शासन मंजुरीनुसार या असाेसिएशनचे प्रमाणपत्र शासकीय नाेकरीसाठी ५ टक्के आरक्षणासाठी पात्र ठरते. याची बाेगस प्रमाणपत्रे देणारे रॅकेट हे आैरंगाबादेतून यासाठी काम करते. संघटना विदर्भात असली तरी प्रमाणपत्र आैरंगाबादेतून दिले जात हाेते.

बारगजे, पतंगे फरार
अंकुशला ताब्यात घेण्यात आले. मात्र, याच प्रकरणात सहभागी असलेल्या पांडुरंग बारगजे आणि शंकर पतंगेने पळ काढला आहे. आता हे तपास पथक यांच्या मागावर आहे. आैरंगाबादमधील रॅकेटने राज्यभरात बाेगस उमेदवारांनाही बनावट प्रावीण्य प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार समाेर आला आहे. टॅम्पाेलियनसह पाॅवरलिफ्टिंग खेळ प्रकारातील बाेगस प्रमाणपत्रांचे माेठ्या संख्येत वितरण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...