आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आझाद चषक टी- 20 स्पर्धा:केसर सुपर संघाचा विजय, औरंगाबाद लॉयन्स संघाला हरवले

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
आकाश विश्वकर्मा - Divya Marathi
आकाश विश्वकर्मा

लकी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित आझाद चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत केसर सुपर संघाने विजय मिळवला. नवल टाटा स्टेडियवर मंगळवारी झालेल्या सामन्यात केसर सुपरने औरंगाबाद लॉयन्स संघावर ५ गडी राखून मात केली. या लढतीत किरण लहाने सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लॉयन्सचा डाव १५.४ षटकांत ९ बाद अवघ्या ८१ धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात केसर सुपर संघाने १२.२ षटकांत ५ गडी गमावत ८५ धावा करत विजय साकारला. यात सलामवीर आकाश विश्वकर्माने शानदार फलंदाजी करत नाबाद ४५ धावांची विजयी खेळी केली. त्याने ३८९ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार व २ उत्तुंग षटकार खेचले.

दुसरा सलामीवीर सय्यद असद अली ३ आणि यष्टिरक्षक सोहिल मुस्सा ५ धावांवर परतले. अष्टपैलू किरण लहानेने १६ चेंडूंत २ चौकार लगावत १८ धावा केल्या. लईक अन्सारी १ धावांवर बाद झाला. आमेर बदाम भोपळाही फोडू शकला नाही. कर्णधार नौशाद हाश्मी ६ धावांवर नाबाद राहिला. लॉयन्सच्या किरण सिंगने २ आणि सैफ पाशा, सुलतान पटेल व महेंद्र भिसे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

किरण, अरमानची भेदक गोलंदाजी

तत्पूर्वी, लॉयन्सच्या फलंदाजांनी केसरच्या किरण लहाने व अरमान मलिकच्या गोलंदाजीपुढे नांग्या टाकल्या. किरणने भेदक मारा करत १७ धावा देत ४ फलंदाजांना तंबुचा रस्ता दाखवला. तर अरमानने फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवत ११ धावांत ३ गडी बाद केले. सलामीवीर मतिनने २८ चेंडूंत ६ चौकार खेचत सर्वाधिक ३० धावा केल्या. वसिम कुरेशीने १७ आणि समिनने १३ धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी निराशा केली. त्यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

बातम्या आणखी आहेत...