आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा खाे - खो लीग:स्पर्श डिफेंडर, पद्मावती अटॅकर्सचा साखळीत विजय, दिशा इंगळे, आकांशा क्षिरसागर उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराचे मानकरी

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर खो-खो संघटना व अजित सिड्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा खो-खो प्रीमियर लीगमध्ये रविवारी झालेल्या साखळी सामन्यात स्पर्श डिफेंडर आणि पद्मावती अटॅकर्स संघांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यात दिशा इंगळे आणि आकांक्षा क्षीरसागर सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराचे मानकरी ठरले.

पहिल्या लढतीत स्पर्शने (१५) समर्थ टायगर्स (१४) संघावर १ गुण व २:१० मिनिटे राखून विजयी मिळवला. स्पर्शच्या ओम लोंढेने १:३० मी. संरक्षण केले, निल जावळेने २:१० मी. संरक्षण केले. स्वरूप सुरडकरने आक्रमणात २ गडी, तनिष्का देवगिरीकरने १.१० मी संरक्षण केले व आक्रमणात १ गडी मारला.

शर्वरी भगतने १:१० मी. संरक्षण केले, अष्टपैलू आकांक्षा क्षीरसागरने १:३० मी. संरक्षण केले व आक्रमणात ४ गडी बाद केले. दुसरीकडे, समर्थ टायगर्सकडून दिव्या बोरसेने १:३० मी. संरक्षण केले, भीम सोनटक्केने आक्रमणात ३ गडी बाद केले. तेजल होलेने १:४० मी. संरक्षण करत आक्रमणात २ गडी मारले. दक्ष क्षीरसागरने १:१० मी. संरक्षण केले, सोनाक्षीने आक्रमणात २ गडी टिपले. विजेत्या संघातील उत्कृष्ट खेळाडूंना राजेंद्रकुमार पवार, मोहन अहिरे, अजय तुपे यांचा हस्ते पारितोषिक देणात आले.

यश मोरे, पायल रोत्रेची चमकदार खेळी

दुसऱ्या रोमांचक सामन्यात पद्मावती अटॅकर्सने (१४) गोदावरी लॉयन्स (१३) संघावर अवघ्या एका गुणांने मात केली.

पद्मावतीकडून यश मोरे २.३० मी. संरक्षण केले व आक्रमणात ३ गडी बाद केले, आनंदी मामुर्डेने २.१० मी. व आकांक्षा हारकळने २.१० मी. संरक्षण केले व आक्रमणात ४ गडी बाद केले, पायल रोत्रेने २:२० मी. व आक्रमणात २ गडी बाद केले. दुसरीकडे, गोदावरी लॉयन्स संघाकडून मृणाल जोगदंडने १.१० मी. संरक्षण केले व आक्रमणात २ गडी बाद केले, तनिष्क शर्माने १.२० मी संरक्षण केले, दिशा इंगळेने २.१० मी. संरक्षण केले व आक्रमणात २ गडी मारले. अनिकेत मराठेने आक्रमणात २ गडी बाद केले, समर्थ हातकंगणेने ३.२ मी. संरक्षण केले. दिशा इंगळे उत्कृष्ट खेळाडू ठरली.

बातम्या आणखी आहेत...