आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर खो-खो संघटना व अजित सिड्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या जिल्हा खो-खो प्रीमियर लीगमध्ये रविवारी झालेल्या साखळी फेरीत स्पर्श डिफेंडर संघाने विजय मिळवला. समर्थ टायगर्स व गोदावरी लॉयन्स यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. या दोन्ही संघांना समान गुण देण्यात आले.
पहिल्या सामाना स्पर्श डिफेंडर विरुद्ध पद्मावती अटॅकर्स यांच्यात झाला. स्पर्शने (१५) पद्मावती संघावर (१४) एक गुणांनी विजयी मिळवला. स्पर्शकडून ओम लोंढेने १.१० मी. संरक्षण केले व २ गडी बाद केले. रोहित बोर्डे १.२० मी. आकांक्षा क्षीरसागरने १.४० मी व १.२० मी. संरक्षण केले. आदित्य भंगाळेने १.३० मी. तर आक्रमणात २ गडी मारले. शुभम जवाहलालने १.२० मी. संरक्षण केले व आक्रमणात २ गडी बाद केले. आदित्य सोरमोरने आक्रमणात ३ गडी बाद केले. पद्मावतीकडून आकांक्षा हारकळने १.२० संरक्षण केले, वैष्णवी पाडसवाणे १.३० मी. संरक्षण केले. रोहन गावितने आक्रमणात १ गडी बाद केला, ऋषिकेश मोरे १.१० मी. संरक्षण केले तर आक्रमणात २ गडी बाद केले. या लढतीत ओम लोंढे सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.
भीम, ऋतुपर्ण, रुद्रराज, अनिकेत चमकले
दुसऱ्या लढतीत समर्थ टायगर्स व गोदावरी लॉयन्स यांच्यातील रोमांचक सामना १८-१८ गुणांनी बरोबरीत सुटला. समर्थकडून भीम सोनटक्केने २.२० मी. संरक्षण केले व आक्रमणात ५ गडी बाद केले. तेजस होलेने आक्रमणात ३ गडी टिपले. ऋतुपर्ण कानूरे १.१० मी. आणि दिशा बोरसेने १.१० मी. संरक्षण केले.
हरिष गुगेलेकरने आक्रमणात १ व सुरुप सुरडकरने २ गडी टिपले. दुसरीकडे, गोदावरी संघाकडून रूद्रराज पुंडने १.२० मी. संरक्षण केले व आक्रमणात २ गडी बाद केले. आयुष गावितने १.२० मी. संरक्षण केले. अनिकेत मराठेने २ मी. संरक्षण केले व आक्रमणात ३ गडी मारले. समर्थ हातकणेने २.३० मी. संरक्षण केले व आक्रमणात ४ गडी बाद केले. दीक्षा इंगळेने १.१० मी. संरक्षण केले, निल बदाणे १.४० मी. संरक्षण केले व आक्रमणात २ गडी बाद केले. तनिष्क शर्माने १.२० मी. संरक्षण केले व आक्रमणात १ गडी बाद केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.