आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोवा सॉफ्टबॉल असोसिएशन व स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गोवा आणि भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी (गोवा) येथे सुरु असलेल्या १३ व्या वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष-महिला फेडरेशन कप सॉफ्टबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाच्या सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली.
पुरुष गटात महाराष्ट्राच्या संघाने दुसऱ्या सामन्यात दिल्ली संघावर ३-० होमरणच्या फरकाने तर तिसऱ्या सामन्यात राजस्थान संघावर १०-२ होमरणच्या फारकाने विजय प्राप्त करत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. आज झालेल्या पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राच्या प्रतीक डुकरे याने उत्कृष्ट कॅचिंगसह 2 होमरण, धीरज बाविस्कर, राज भिलारे, सुमेध तळवेलकर आणि ऋतिक फाटे यांनी शानदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत.
महिलांनी काढला मध्य प्रदेशचा वचपा
महिला गटात महाराष्ट्राच्या संघाला पहिल्या सामन्यात मध्य प्रदेशने पराभूत केले होते. त्यानंतर चौथ्या सामन्यात महाराष्ट्राने मध्य प्रदेशला २-० होमरणांनी एकतर्फी पराभूत करत पराभवाचा वचपा काढला. तत्पूर्वी महाराष्ट्राच्या महिलांनी दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करत तेलंगना संघावर ७-० ने आणि तिसऱ्या सामन्यात यजमान गोवा संघावर 10-0 होमरणांनी सहज विजय मिळवला.
महाराष्ट्राने विरोधी संघाला एकही रन करण्याची संधी दिली नाही. महाराष्ट्राच्या भेदक पिचिंग पुढे त्यांचा एकही फलंदाज टिकू शकला नाही. आजच्या सामन्यात महाराष्ट्राच्या विजयात विनिता पाटील, प्रीती कांबळे, सई जोशी, ऐश्वर्या पुरीने प्रत्येकी 1 होमरण मारले. तसेच स्वप्नाली वायदंडे हिने उत्कृष्ट पिचिंग करत आपल्या संघाना विजय प्राप्त करुन देण्यात महत्वाचे योगदान दिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.