आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित वरिष्ठ महिला निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत नाशिक संघाने सेक्रेटरी इलेव्हन संघावर १० गडी राखून मात केली. दुसरीकडे, यजमान छत्रपती संभाजीनगर-विलास संघ यांच्यातील सामना रद्द झाला.
एमजीएम स्पोर्ट््स क्लबवर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सेक्रेटरी इलेव्हनने २० षटकांत ४ बाद ६३ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात नाशिकने १४.५ षटकांत बिनबाद ६४ धावा करत विजय साकारला. यात सलामीवीर साक्षी कांदीने ४९ चेंडूंत ३ चौकारांसह नाबाद २८ धावा काढल्या. तेजस्वीनी बतवालने ४० चेंडूंत २ चौकारांसह नाबाद २७ धावांची विजयी खेळी केली.
तत्पूर्वी, सेक्रेटरी इलेव्हनकडून सलामीवीर ज्ञानदा निकमने १२ धावा केल्या. पल्लव बोडखेने ३२ चेंडूंत १ चौकारासह १५ धावा काढल्या. पायल पवारने ३२ चेंडूंत २ चौकार लगावत १८ धावा जोडल्या. अनुश्री ७ धावांवर नाबाद राहिली. नाशिककडून ऐश्वर्या वाघने ४ षटकांत अवघ्या ४ धावा देत ३ फलंदाजांना तंबूतचा रस्ता दाखवला. लक्ष्मी यादवने एकाला बाद केला.
युनायटेडचा १०० धावांनी विजय
दुसरीकडे, बीडकिन मैदानावर झालेल्या सामन्यात युनायटेडने प्रेसिडेन्ट इलेव्हन संघावर १०० धावांनी मात केली. प्रथम खेळताना युनायटेडने ५० षटकांत सर्वबाद २३९ धावा उभारल्या. यात कर्णधार पुनम खेमनारचे शतक अवघ्या एका धावाने हुकले. सलामीवीर गौतमी नाईकने १४ धावा केल्या. पुनमने ९७ चेंडूंचा सामना करताना ८ चौकारांसह सर्वाधिक ९९ धावांची अर्धशतकी खेळी केली.
सायली लोणकरने १२, रोहिणी मानेने ३८, प्रज्ञा वीरकरने २१, मनाली कुलकर्णीने १२ व प्रियंका कुंभकरने नाबाद १४ धावा काढल्या. इलेव्हनकडून ऋषिकता जंजाळने ३ व ए. गायकवाडने २ बळी घेतले. प्रत्युत्तरात प्रेसिडेन्ट इलेव्हनचा डाव ४०.२ षटकांत १३९ धावांवर संपुष्टात आला. प्रज्ञा वीरकरने १९ धावांत ५ गडी बाद केले. गौतमी नाईकने २ बळी घेतले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.