आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटेबल टेनिस प्रेमींतर्फे आयोजित जिल्हा टेबल टेनिस कनिष्ठ व वरिष्ठ गट सांघिक चॅम्पियनशिपमध्ये कनिष्ठ गटात श्लोक संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. दुसरीकडे, वरिष्ठ गटात मनोज संघाने अजिंक्यपद मिळवले.
विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या स्पर्धेत चार संघांनी सहभाग घेतला होता. प्रथम अशाप्रकारची सांघिक स्पर्धा शहरात घेण्यात आली. त्यामुळे युवा खेळाडूंना वरिष्ठ खेळाडू सोबत खेळवण्याची व त्याच्याकडून शिकण्याची संधी मिळाली.
‘जवळपास वर्षभरानंतर खेळाडूंना स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली, त्यामुळे मैदानावर परतल्याचा आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया युवा खेळाडू कनक मालूने दिली. विजेत्या संघांना जितेंद्र मालू यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय खेळाडू निलेश मित्तल, विक्रम देकाते, संदीप अभ्यंकर, प्रायोजक कुलजित सिंग दरोगा यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्लोकने अमेय संघाला हरवले :
कनिष्ठ गटात श्लोक संघाने शानदार प्रदर्शन करत अमेय संघावर ३-१ ने मात करत प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघात श्लोक बाहेती, चाण्यक्य पाटील, अंश पटेल यांचा समावेश आहे. तर उपविजेत्या संघातील अमेय आठवले, ए. डेकाते, श्रृष्टी राजूरकर यांचे प्रयत्न अपुरे पडले.
मनोज संघाची कनक संघावर मात :
पुरूष गटात मनोज संघाने उत्कृष्ट कामगिरी करत कनक संघाला ४-२ ने पराभवाची धुळ चारत जेतेपद मिळवले. विजेत्या संघाकडून मनोज कानोडजे, डॉ. अक्षय मारवार, संजीव गायकवाड, अजिंक्य जोशी, उमेश वाघमारे यांची महत्वाचे योगदान दिले. दुसरीकडे, उपविजेत्या संघाकडून कनक मालू, काजल जैस्वाल, रवी साळुंके, डॉ. झुबेद पटेल, शिवाजी खरात यांची अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.