आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किक बॉक्सिंग:विभागीय शालेय किंकबॉक्सिंग स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी वर्चस्व; अनुष्का, श्रेया, आर्यनला सुवर्ण

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित व किकबॉक्सिंग संघटनेच्या सहकाऱ्याने झालेल्या विभागीय शालेय किंकबॉक्सिंग स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले. स्पर्धेत अनुष्का येवले, श्रेया कुलकर्णी, दिशा सोनार, आर्यन शिरसाठ, विश्वजीत नवले, प्रथमेश पंडित यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक आपल्या नावे केले. विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या स्पर्धेत बीड, जालना, परभणी, हिंगोली व औरंगाबादच्या एकूण १४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी औरंगाबाद विभागीय संघात निवड झाली आहे. स्पर्धेचे उद्घाटन औरंगाबाद शहर किकबॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब मानकापे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी क्रीडा अधिकारी लता लोंढे, संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश मिरकर, सचिव अनिल मिरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे : १४ वर्ष मुली - २८ किलो श्रावणी वैद्य (परभणी), डिंपल रमंडवाल (औरंगाबाद). ३२ किलो - मोनिका हिरडे (औरंगाबाद शहर), नंदिनी पवार (परभणी), प्रगती सूर्यवंशी (हिंगोली). ३७ किलो - सोनल बनसोडे (परभणी), भक्ती बरकसे (औरंगाबाद), स्नेहा डोभाळ (औरंगाबाद ग्रामीण). ४२ किलो - अनुष्का येवले (औरंगाबाद शहर), सानिका कांबळे (परभणी शहर). ४६ किलो - दिशा सोनार (औरंगाबाद शहर), गायत्री नेमटे (बीड), दिव्या काळे (हिंगोली). ५० किलो - श्रेया कुलकर्णी (औरंगाबाद शहर). मुले २८ किलो - श्रीनिवास स्वामी (परभणी शहर), प्रथमेश कुदळे (परभणी ग्रामीण), अयाज खान पठाण (हिंगोली). ३२ किलो - कार्तिक भेसर (औरंगाबाद शहर), साई पाटील (औरंगाबाद ग्रामणी). ३७ किलो मानस मुठ्ठे (औरंगाबाद शहर), शशिकांत बैबांड (औरंगाबाद ग्रामीण), वीर सिंग (परभणी शहर). ४२ किलो - प्रथमेश पंडित (औरंगाबाद शहर), प्रणव बागतकर (हिंगोली), परमेश्वर चोले (बीड). ४७ किलो - आर्यन शिरसाठ (औरंगाबाद शहर), आयुष काळे (बीड), समर्थ शेलार (औरंगाबाद ग्रामीण). ५२ किलो - विश्वजीत नवले (औरंगाबाद शहर), प्रथमेश तांदळे (बीड), कृष्णा कोल्हे (हिंगोली). ५७ किलो - आर्यन ठिगळे (बीड), श्लोक कंठवार (हिंगोली), विराज लव्हाटे (औरंगाबाद ग्रामीण).

बातम्या आणखी आहेत...