आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Aurangabad Swami Vivekanand School : Notice Of Sudden Termination Of Service To 32 Teachers And Non teaching Staff, Staff Standing In Front Of School Gates

औरंगाबाद स्वामी विवेकानंद अकादमी:32 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अचानक सेवा समाप्तीची नोटीस, कर्मचाऱ्यांचा शाळेच्या गेटसमोर ठिय्या

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरात असलेल्या स्वामी विवेकानंद अकादमी शाळेतील 32 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अचानक सेवा समाप्तीचे पत्र देऊन काढले. मराठी मध्यमात प्रवेश होत नाही असे कारण पुढे करत त्यांना सेवा समाप्तचे पत्र देण्यात आले. अचानक झालेल्या या प्रकाराने शिक्षक शाळेच्या गेटवर जमा झाले होते.

20 वर्ष प्रामाणिकपणे काम करतो आहोत कोरोनाचा काळ नोकरीवरून काढू नका असे मुख्यमंत्री सांगत आहेत. मग आमच्यावर अन्याय का? असा सवाल या शिक्षकांनी केला आहे. तीन महिने आधी तरी सांगायला हवे होते आम्ही दुसरीकडे सोय केली असती पण आज काहीजण वयाच्या 50 त आहे त्यांना कोण काम देणार असा सवालही या शिक्षकांनी विचारला आहे.

प्रशासक म्हणतात...
मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. याच कारणामुळे अतिरिक्त शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संस्थेने हे पत्र देऊन सेवा समाप्त केले आहे. स्वामी विवेकानंद अकादमी शाळेचे प्रशासक सत्यनारायण जयस्वाल यांनी ही माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...