आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने यंदाच्या वर्षी पासून क्रीडा क्षेत्रात जलतरण खेळात विशेष योगदान व कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यंदा पहिला जीवन गौरव पुरस्कार डॉ.सुंदरबाबू सरोसिया यांना प्रदान करण्यात आला. सोहळ्यात आमदार प्रदिप जैस्वाल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. आयुष्याची अनेक वर्ष क्रीडा क्षेत्राला समर्पित करणारे व भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात संघटनेचा उद्देश आहे.
डॉ. सरोसिया यांनी वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत असताना क्रीडा क्षेत्रात विशेषतः जलतरण खेळात राष्ट्रीय पदक विजेती कामगिरी केली. ते युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहेत. तरुणांना भविष्यासाठी मोलाचा सल्ला देतात. या पुरस्कार सोहळ्यास संघटनेचे अध्यक्ष रुस्तुम तुपे, राष्ट्रीय पदक विजेते विष्णू लोखंडे, उपाध्यक्ष राजेंद्र काळे, कोषाध्यक्ष रवींद्र राठी, अशोक काळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी संघटनेचे अभय देशमख, रवींद्र पवार, कदीर खान, एकनाथ शेळके, एकनाथ मगर, गोपीनाथ खरात, धनंजय जगताप, डॉ.संदीप जगताप, निखिल पवार, अजयसिंग पाल, अभिषेक अंभोरे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना कुडे यांनी केले व आभार प्रदर्शन अजय दाभाडे यांनी मानले.
जलतरणाला मदत करणार : आ. जैस्वाल
जलतरण खेळ मुलांपासून ते जेष्ठांपर्यत सर्वांसाठी आहे. यात वयाचे बंधन नाही. तंदुरुस्त राहण्याची पोहणे सर्वात्तम व्यायाम आहे. जलतरण खेव खेळाडूंच्या मी नेहमी पाठिशी राहिल. त्यांना हवी ती मदत करेल. शासनस्तरावर पाठपुरावा करेल, असे आश्वासन आमदार प्रदीप जैस्वाल यांनी दिले.
नवी ऊर्जा मिळाली
आज संघटनेच्या वतीने मला जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याने आंनद वाटतो. विशेष करून पहिल्या पुरस्कारासाठी विचार केल्याने हा माझा फार मोठा सन्मान आहे. या पुरस्कारामुळे काम करण्याची नवी ऊर्जा मिळाली आहे. अखेरच्या श्वासापर्यंत जलतरणासाठी काम करेल, अशी ग्वाही डॉ. सरोसिया यांनी सत्काराला उत्तर देताना दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.