आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने टक्केवारी वाढवली:गेल्या सात दिवसांत औरंगाबाद तालुक्यात 348.7 टक्के पर्जन्यमान; गत 24 तासांत पडला 44 मिमी पाऊस

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबर महिन्यातील गत सात दिवसांत सरासरी 13.7 मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत 47.8 मिमी म्हणजेच 348.7 टक्के पर्जन्यमान झाले आहे. विशेष म्हणजे सहा दिवसांत केवळ 3.8 मिमी तर गत 24 तासांत 44 मिमी विक्रमी पर्जन्यमान झाले. अतिपाऊस फळपिकांसाठी हानीकारक ठरू लागला आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. बंगालच्या उपसागरावर कमी हवेचा दाब निर्माण झालेला आहे. तर आपल्याकडे ऑक्टोबर हिट सुरू आहे.

तापमान वाढ, आर्द्रतायुक्त वातावरण ईशान्य मार्ग आपल्याकडे परतीचा पाऊस खेचून आणण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. परिणामी गत चोवीस तासांत पूर्व भागात मेघ गर्जनेसह धो-धो पाऊस पडला. औरंगाबादेत गुरुवार सकाळी आठ ते शुक्रवार सकाळी साडेआठ वाजेपर्यंत चौका, उस्मानपुरा मंडळात अतिवृष्टी, तर उर्वरित आठ मंडळातही परतीच्या पावसाने दाणादाण उडवली. अतिपाऊस खरीपातील काढणीस आलेल्या सोयाबीन, कापुस, ज्वारी, बाजरी आदी पिकांसाठी मारक ठरू लागला आहे.

चाकरमान्यांचे हाल

शहरातील काही प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची चाळणी झाली आहे. खड्ड्यात साचलेल्या पाण्यात वाहने जावून आदळत आहेत. पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

गत सात दिवसांतील औरंगाबाद तालुक्यातील मंडळनिहाय पर्जन्यमानाचा आलेख

मंडळाचे नाव अपेक्षित प्रत्यक्षातील पाऊस टक्केवारी

औरंगाबाद - 13.7 29.8 मिमी 217.5

उस्मानपुरा - 13.7 70.0 510.9

भावसिंगपुरा - 13.7 42.3 308.8

कांचनवाडी - 13.7 59.8 436.5

चिकलठाणा - 13.7 52.0 379.6

चित्तेपिंपळगाव - 13.7 26.3 192.0

करमाड - 13.7 22.5 164.2

लाडसावंगी - 13.7 38.5281.0

हर्सूल - 13.7 48.8 356.2

चौका - 13.7 87.3 637.2

एकूण - 13.7 47.8 348.7

रब्बीसाठी उपयुक्त

ऑक्टोबर हिट जाणवायला सुरुवात झाली होती. तापमान 1 ते 3 अंशांपर्यंत वाढले होते. पिकांना पाणी देण्याची शेतकऱ्यांनी लगबग सुुरु केली होती. मात्र, परतीचा पाऊस दाखल झाला आहे. यामुळे रब्बीसाठी व जलपुनर्भरणासाठी उपयुक्त ठरणार आहे.

स्थळनिहाय पर्जन्यमानात कमालीचा फरक

औरंगाबाद मंडळात 26.8 मिमी तर उस्मानपुऱ्यात 64.5 मिमी, चौका मंडळात तर 87.3 मिमी पाऊस पडला आहे. तसेच काही वेळातच हा पाऊस ढग फुटीसारखा झाला आहे. उर्वरित सहा दिवस येथे 1 मिमीही पाऊस पडलेला नाही. म्हणजे पावसाची तूट होती ती एकाच दिवसातील काही वेळत पडलेल्या पावसाने तूट भरून काही पटींनी सरासरीचे गणित वाढवले आहे. हा अतिपावासाचे फायदे कमी व नुकसानच जास्त होत आहे.

गारवा, उकाडा

पावसामुळे सकाळपर्यंत गारवा जाणवत आहे. तर त्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत दमट वातावरण राहते. दुपारी उन्हाचा चटका व उकाडा असतो. यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. फळपिकांच्या गुणवत्ता दर्जा पोषकतेवर परिणाम होतो.

बातम्या आणखी आहेत...