आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक मतमोजणीस सुरवात झाली आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली.
मतमोजणीसाठी साधारण 700 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना दोन वेळा प्रशिक्षण देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे भाजपचे उमेदवार किरण पाटील अपक्ष तसेच मराठवाडा शिक्षकचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव, वंचित बहुजन आघाडीचे कालिदास माने यासह 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. यापैकी गुरुजींचा उमेदवार कोण होणार?, हे आज कळणार आहे.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने , जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे, परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, हिंगोलीच्या जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, नांदेडच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, औरंगाबाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जालना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश मणियार, औरंगाबादचे निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, महसूल उपायुक्त पराग सोमण, उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह सर्व जिल्हाधिकारी उपस्थित आहेत.
56 टेबलांवर मतमोजणी
विधानपरिषदेच्या औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी विभागातील आठ जिल्ह्यांत एकूण 53 हजार 257 मतदारांनी मतदान केले आहे. सुरूवातीला मतपेटीतील मतांची मोजणी सुरू झाली आहे. त्यानंतर 25 मतपत्रिकेचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिकांचे सरमिसळ करण्यात येईल. यातून 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे 40 गठ्ठे अशी, एक हजार मते प्रत्येक टेबलवर देण्यात येतील. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात येईल. एकूण वैध मताप्रमाणे कोटा निश्चित करण्यात येईल.
पहिल्या पसंतीच्या मतावर उमेदवार विजयी झाल्यास संध्याकाळी सहापर्यंत निकाल लागू शकतो. मात्र, दुसऱ्या पसंतीवर निकाल लागल्यास रात्री निकालासाठी उशीर लागण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.