आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत होलसेल कापड दुकानाला भीषण आग:अग्निशमन दलाचे 7 बंब घटनास्थळी, शहांगज परिसरात धुराचे लोट

प्रतिनिधी । औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज मकर संक्रांतीच्या दिवशीच गजबजलेल्या शहागंज परिसरात एका होलसेल कापड दुकानाला भीषण आग लागली. संक्रांतीमुळे नेहमीपेक्षा अधिक ग्राहकांची कापड खरेदीसाठी गर्दी झालेली असतानाच ही दुर्घटना झाली. त्यामुळे शहागंज परिसरात खळबळ उडाली.

अग्निशमनदलाच्या 7 गाड्या घटनास्थळी

दुपारी या कापड दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. आग लागलेल्या दुकानाच्या आजुबाजूला इतरही मोठ-मोठी होलसेल कापड दुकाने आहेत. त्यामुळे ही आग इतर दुकानांपर्यंत जाऊ नये, यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 7 गाड्या दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी पोलिसही दाखल झाले असून अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

परिसरात धुराचे लोट

रविवारी दुपारी शहागंज येथील न्यु फॅशन होलसेल कापड दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील गोडाऊनला आग लागली. पाहता पाहता आगीचा भडका उडाला आणि परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळाले. घटनास्थळी औरंगाबाद महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे 7 बंब दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

इतर दुकानांतही आग भडकण्याची शक्यता

मात्र, आग मोठ्या प्रमाणावर पसरली असल्याने अग्निशमन दलाला अथक प्रयत्न करावे लागत आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आग आणखी भडकण्याची शक्यता आहे. औरंगाबाद शहरातील गजबजलेल्या शहागंज परिसरात कपडा मार्केट आहे. आजूबाजूला मोठमोठी कापडाची होलसेल दुकान आहेत. त्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
बातम्या आणखी आहेत...