आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उघडले पर्यटनाचे दार:​​​​​​​पर्यटकांनो या, राजधानीत तुमचे सहर्ष स्वागत आहे!; पुरातत्त्वच्या अखत्यारीतील धार्मिक स्थळे बंदच

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वेरूळच्या जगप्रसिद्ध लेणीत बुधवारी तुरळक संख्येने पर्यटक आले होते. हे सर्व जण स्थानिकच होते

वेरूळ, अजिंठा लेणी, दौलताबादचा देवगिरी किल्ला, बीबी का मकबरा आणि औरंगाबाद लेणी ही जिल्ह्यातील पाच प्रसिद्ध पर्यटनस्थळे उघडण्यास बुधवारपासून परवानगी देण्यात आली. त्यामुळे पर्यटनाच्या राजधानीतील या व्यवसायाला गती मिळण्याचा मार्ग माेकळा झाला. पहिल्या दिवशी या स्थळांच्या स्वच्छतेची कामे करण्यात आली. आता गुरुवारपासून (१७ जून) नागरिकांना प्रवेश देण्यात येणार अाहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून सुरुवातीला प्रत्येक पर्यटनस्थळावर दिवसभरात फक्त दोन हजार लोकांनाच परवानगी दिली जाईल. सकाळच्या सत्रात एक हजार आणि दुपारच्या सत्रात एक हजार लोकांना प्रवेश देण्यात येईल.

ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल. या पाचही पर्यटनस्थळांच्या परिसरातील िवक्रेते, गाइड यांना काेराेना प्रतिबंधक लसीचे दाेन्ही डाेस किंवा आरटीपीसीआर चाचणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबतचे आदेश काढले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण मंडळांतर्गत येणारी जिल्ह्यातील धार्मिक स्थळे मात्र बंदच राहतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

पहिल्या दिवशी ४९४ पर्यटकांची मकबरा भेट
पहिल्याच दिवशी बीबी का मकबऱ्याला ४९४ पर्यटकांनी भेट दिली. जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांची बुकिंग केंद्रीय पद्धतीने थेट ऑनलाइन जोडली आहेत. मात्र, बुधवारी दुपारपर्यंत सर्व्हरमध्ये नोंदणी करण्यास अडचण येत हाेती. दिल्लीवरूनच ही अडचण सोडवण्यात आली. दुपारी एक ते दीडच्या सुमारास २०० पर्यटकांनी तिकीट काढले. सायंकाळपर्यंत ४९४ जणांनी भेट दिली.

अजिंठा-वेरूळच्या लेण्यांत साफसफाई
जगप्रसिद्ध अजिंठा, वरूळ लेण्यांमध्येही बुधवारी साफसफाई करण्यात आली. पर्यटकांच्या सुरक्षेत कुठेही बाधा येणार नाही याबाबतचा आढावाही घेण्यात आला. पहिल्या दिवशी तुरळक पर्यटक आले. गुरुवारपासून संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पाणचक्की, सोनेरी महाल बंदच
प्रमुख पर्यटनस्थळे सुरू केली असली तरी शहरातील पाणचक्की, सोनेरी महाल आणि छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तुसंग्रहालय अद्यापही बंद अाहेत. गाइड, विक्रेत्यांना आरटीपीसीआर चाचणी किंवा लसीकरण सक्तीचे

बातम्या आणखी आहेत...