आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटी रोजगार मेळावा:विद्यापीठात मंगळवारी 20 पेक्षा अधिक कंपन्यांचा नोकरी मेळावा; काय असेल पात्रता? कुठे कराल अर्ज?, जाणून घ्या

छत्रपती संभाजीनगर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मंगळवारी( 21 मार्च) आयटी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात 20 पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग असणार आहे. आयटी क्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि नॅशनल इंस्टिट्युट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इंफर्मेशन टेक्नॉलॉजी अर्थात नायलटतर्फे मेगा नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 20 मार्च सायंकाळी 5 वाजेपर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. गिरीष काळे यांनी केले आहे.

काय असणार पात्रता?

आयटी क्षेत्राची पार्श्वभूमीवर असलेल्या कोणत्याही पदवी आणि पदव्युत्तर पदवी उमेदवारास या मेळाव्यात नाव नोंदवता येईल. याशिवाय इतर शाखेत शिक्षण झालेले विद्यार्थ्यांना जर संगणक, आयटीचे ज्ञान असेल तर ते देखील प्रयत्न करू शकतात असे डॉ. काळे यांनी म्हटले आहे.

बीएस्सी (संगणक व माहितीतंत्रज्ञानशास्त्र), बीसीए, बीसीएस, एमएस्सी (संगणक आणि माहिती तंत्रज्ञानशास्त्र), एमसीए, बीई (संगणक आणि माहिती तंत्रज्ञानशास्त्र) बीटेक (संगणक आणि माहिती तंत्रज्ञानशास्त्र) आणि एमटेक (संगणक व माहिती तंत्रज्ञानशास्त्र) झालेले विद्यार्थी तर पात्र आहेत.

कुठे भराल अर्ज?

मेळाव्यासाठी उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदवणे आवश्यक आहे. नायलेटच्या सभागृहात मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून मुलाखतींना सुरूवात होणार आहे.

https://tinyurl.com/bdhd4kan या लिंकवर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे असल्याचेही डॉ. काळे यांनी म्हटले आहे. मुलाखतीचे किंवा त्यानंतरचे सर्व निरोप ई-मेल किंवा एसएमएसद्वारे दिले जातील.

जॉब प्रोफाईलचे सँपल पाहण्यासाठी खालील लिंकवर विद्यार्थ्यांना टॅप करता येईल.

नेट डेव्हलपर्स-

https://drive.google.com/file/d/1t1hWTLBcAwdT4dDU7zQ-6qMkmkNQ7BN-/view?usp=share_link

...

नेटवर्क इंजिनिअर सपोर्ट ट्रेनी- https://drive.google.com/file/d/1jHmJIJYqFAJ0KSxV4TzSmZ6d-gtl7i6T/view?usp=share_link

..

ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर- https://drive.google.com/file/d/1a7l7TpikEISYnkI1iPSVMGLk_ASKGdzQ/view?usp=share_link

..

टेक्निकल सपोर्ट इंजिनियर- https://drive.google.com/file/d/1a7l7TpikEISYnkI1iPSVMGLk_ASKGdzQ/view?usp=share_link

...

बातम्या आणखी आहेत...