आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून खुल्लमखुल्ला:सर्व प्रकारची दुकाने पुर्णवेळ उघडणार, लग्न सोहळ्यांना गर्दीची अट नाही

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल तरच दुकाने उघडण्याची मुभा

काेराेनाचा प्रकाेप कमी झाल्यामुळे राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार साेमवारपासून (सात जून) औरंगाबाद शहराची बाजारपेठ आठवड्याचे सातही दिवस पूर्णवेळ उघडणार आहे. शहर व जिल्ह्यात १५ मार्चपासून अंशत:, तर १८ एप्रिलपासून कडक लाॅकडाऊन हाेता. त्याचा चांगला फायदा हाेऊन दाेन महिन्यांत रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली. त्यामुळे एक जूनपासून काही निर्बंध उठवण्यात आले हाेते. मात्र, आता साेमवारपासून शहरातील बाजारपेठेवर वेळेचे कुठलेही निर्बंध राहणार नसून सर्वच प्रकारची दुकाने दिवसभर खुली ठेवता येतील. मात्र व्यापाऱ्यांना दर १५ दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करून निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र साेबत ठेवावे लागेल.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात मात्र तुलनेने रुग्णसंख्या जास्त असल्यामुळे तिथे शनिवार- रविवारी लाॅकडाऊन असेल. तर साेमवार ते शुक्रवारी सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंतच सर्व प्रकारची दुकाने खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. काेराेना रुग्णांचा पाॅझिटिव्हिटी रेट व व्यापलेले ऑक्सिजन बेड असे निकष ठरवून राज्य सरकारने प्रत्येक शहर व जिल्ह्याचे पाच टप्प्यांत वर्गीकरण करून अनलाॅकचे नियम ठरवून दिले हाेते. त्यात औरंगाबाद शहरात सध्या पाॅझिटिव्हिटी रेट २.२४ टक्के इतका नीचांकी पातळीवर आलेला असून २२.१९ टक्केच ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापलेले आहेत. त्यामुळे हे शहर सरकारच्या वर्गवारीनुसार पहिल्या टप्प्यात (लेव्हल वन) माेडते. त्यानुसार आता औरंगाबाद मनपा हद्दीतील बाजारपेठेवर वेळेचे कुठलेही बंधन राहिलेले नाही.

आठवड्यातील सातही दिवस सर्वच प्रकारची दुकाने खुली ठेवता येतील. जमावबंदी, संचारबंदीही उठवण्यात आली आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई- पासचीही अट रद्द करण्यात आली आहे. ग्रामीण भागात मात्र रुग्णवाढीचा दर (पाॅझिटिव्हिटी रेट) ५.४५ टक्के, तर व्यापलेल्या ऑक्सिजन बेडची टक्केवारी २०.३४ आहे. त्यामुळे मनपा हद्दीबाहेरचा भाग सरकारने ठरवून दिलेल्या निकषांच्या तिसऱ्या टप्प्यात (लेव्हल ३) माेडताे. त्यामुळे तिथे जमावबंदी, संचारबंदीसह काही निर्बंध कायम असतील. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी साेमवारी हे आदेश काढले आहेत.

मास्क, सॅनिटायझर, डिस्टन्सिंगचा नियम पाळणे अनिवार्य

 • बाजारपेठेत सहा फुटांचे अंतर ठेवणे, मास्क- फेसशील्ड, सॅनिटायझरचा वापर करणे सक्तीचे आहे. ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक पेमेंट सुविधा उपलब्ध करून द्यावी.
 • नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांना दंड ठोठावून कोरोना महामारी असेपर्यंत ती दुकाने सील केली जातील.

जबाबदारीचे भान ठेवूनच आज टाका घराबाहेर पाऊल
ज्या दिवसाची अापण सर्वच जण आतुरतेने वाट पाहात हाेताे ताे आज आशादायी, चैतन्यमय दिवस घेऊन आजचा साेमवार उजाडलाय. दीड-दाेन महिन्यांच्या खंडानंतर आज बाजारपेठ पूर्णपणे उघडतेय. हा क्षण जितका अर्थव्यवस्थेला उभारी देणारा असेल तितकाच तमाम औरंगाबादकरांच्या आयुष्यात नवी आशा पल्लवित करणाराही असेल.

हे सुरू : किराणा दुकाने, स्टेशनरी, इलेक्ट्राॅनिक्स वस्तू, भांडी बाजार, चप्पल- बुटाची दुकाने यासह सर्व प्रकारची दुकाने, माॅल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, रेस्टाॅरंट, हाॅटेल्स (डायनिंगसह), क्रीडांगणे, उद्याने, खासगी कार्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालये, खासगी कार्यालये, उद्याेग, चित्रीकरण, स्नेहसंमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम, करमणुकीचे कार्यक्रम, जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर पूर्णवेळ सुरू राहतील.

हे बंदच : धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था
शहरातील धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये, काेचिंग क्लासेस यासह सर्व शैक्षणिक संस्था या संदर्भात राज्य सरकाने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ती पूर्वीप्रमाणे बंदच राहतील. याबाबत सरकारकडून स्वतंत्र परिपत्रक काढण्यात येईल, त्यानंतर जिल्हा पातळीवर आदेश काढले जातील, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

 • जमावबंदी, संचारबंदीचे निर्बंध मागे घेण्यात अाले.
 • विवाह समारंभ, अंत्यविधी, प्रचार सभांना उपस्थित संख्येचे आता निर्बंध नाहीत.
 • बांधकामाच्या ठिकाणी काेणतेही निर्बंध नाहीत
 • एसटी, खासगी बस वाहतूकही पूर्ण क्षमतेने सुरू राहील. फक्त प्रवाशांना उभ्याने प्रवास करता येणार नाही.
 • आंतर जिल्हा प्रवासास ई- पासची अटही रद्द करण्यात आली आहे.
 • सर्व प्रकारची दुकाने पूर्णवेळ उघडणार
 • जमावबंदी-संचारबंदी मागे
 • लग्न साेहळ्यांना गर्दीची अट नाही

ग्रामीण भागात शनिवार-रविवार लाॅकडाऊन कायम
औरंगाबाद | राज्य सरकारने अनलाॅकसाठी ठरवून दिलेल्या निकषांत औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भाग स्थान तिसऱ्या स्थानावर (लेव्हल ३) आहे. त्यामुळे या भागात काेराेना नियंत्रणासाठीचे निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आलेले नाहीत. ग्रामीण भागातील सर्व प्रकारची दुकाने, हाॅटेल्स साेमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच खुली राहतील. शनिवारी व रविवारी लाॅकडाऊन असेल. तसेच जमावबंदी, संचारबंदी पूर्वीप्रमाणेच कायम असेल.

 • लग्नासाठी जास्तीत जास्त ५०, अंत्यविधीसाठी २० लोकांना परवानगी
 • हॉटेल, रेस्टाॅरंट साेमवार ते शुक्रवारी दुपारी ४ पर्यंत ५० टक्केच आसन व्यवस्थेची मर्यादा. ४ नंतर व शनिवार- रविवारी फक्त पार्सल
 • मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद.
 • सार्वजनिक ठिकाणे, क्रीडांगणे, उद्याने : पहाटे ५ ते सकाळी ९
 • खासगी आस्थापना : सायंकाळी ४ पर्यंत सुरू. बँका, विमा, औषध कंपनी व गैर-बँकिंग वित्त-संस्था इ. कार्यालये मात्र नियमित सुरू.
 • शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयांत ५० टक्के उपस्थिती.
 • अत्यावश्यक सेवा, कृषी, बँक मान्सूनपूर्व कामांशी संबंधित यंत्रणा, कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील.
 • स्नेहसंमेलने : आसन क्षमतेच्या ५०% उपस्थितीत ४ वाजेपर्यंत
 • प्रचार सभा/ बैठका : आसन क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत मुभा.
 • बांधकाम : साइटवर निवासी/ वास्तव्यास मुभा.
 • कृषी संबंधित बाबी : सातही दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत खुले.
 • ई-कॉमर्स वस्तू व सेवा : सातही दिवस पूर्ण वेळ सुरू राहतील.
 • सायंकाळी ५ वाजेनंतर संचारबंदी. सकाळी ७ ते दुपारी ५ वाजेपर्यंत ५ पेक्षा जास्त व्यक्तींना जमण्यास बंदी
 • जिम/ सलून/ ब्युटी पार्लर : आसन क्षमतेच्या ५० टक्के, दरराेज सुरू.
 • सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने सुरू, पण प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास मनाई आहे.
 • आंतर जिल्हा वाहतुकीसाठी ई- पासची गरज नाही.
 • उद्याेग राेज सुरू, चाचणीची अट.

दु:खाचे हे प्रसंगही विसरू नका...
अनलाॅकची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे गेले दीड- दाेन महिने बंधनात असलेल्या नागरिकांची सुटका झाली. मात्र, आता आपल्याला घराबाहेर पडताना जास्त जबाबदारीने वागावे लागेल. कारण काेराेनाचा कहर संपलेला नाही. याच महामारीने आतापर्यंत जिल्ह्यातील ३२७० जणांचे प्राण घेतलेले आहेत. खरा आकडा यापेक्षा कितीतरी अधिक आहे. अाॅक्सिजन, रेमडेसिविरच्या तुटवड्यानेनाकीनऊ अाणले, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे आजपासून निर्बंधामधून मिळणारी सूट अतिशय गांभीर्याने घ्यायला हवी. स्वातंत्र्याचा लाभ घेताना त्याचा गैरवापर हाेणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. स्वत:सह आपले कुटुंबीय व शहराला संभाव्य तिसऱ्या लाटेपासून वाचवणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...