आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:भोकरदन पंचायत समितीच्या सदस्या पुष्पाबाई जाधव यांची गळफास घेऊन आत्महत्या

भोकरदन6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील नळणी बु. गणातील भाजपच्या पंचायत समिती सदस्या पुष्पाबाई गजानन जाधव वय ३५ वर्षे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवार दि. १० रोजी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही

याप्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. दरम्यान घटनेची मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवारी रात्री पुष्पाबाई या घरात एकट्याच झोपल्या होत्या. तर बाहेर चबूतऱ्यावर झोपलेले पती गजानन जाधव हे सकाळी उठल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केली. मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता.

घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बी.डी. कोठुरे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, पुतणे, दीर, भावजय असा परिवार आहे. त्यांच्यावर नळणी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...