आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:कोरोना रुग्णसंख्या घटल्याने 4 ऑक्टोबरपासून डीएलएड महाविद्यालय प्रत्यक्ष होणार सुरू

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाबाधित रुग्णसंख्या घटल्याने सोमवार दि.4 ऑक्टोबरपासून राज्यातील अध्यापक विद्यालये सुरु करण्याचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषदेने घेतला आहे. याबाबत प्रशिक्षण परीषदेच्या उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, प्रशिक्षण संस्थांना सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 38 डी.एल.एड. महाविद्यालय कोरोना नियमांचे पालन करत प्रत्यक्ष सुरु होणार आहेत.

मागील दोन वर्षापासून राज्यातील डीएलएड महाविद्यालये कोरोनामुळे बंद होती. ऑनलाईनच्या माध्यमातून प्रशिक्षण वर्ग सुरु असले तरी, इंटरनेट, मोबाईलच्या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत होत्या. सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे शिक्षण विभागाने येत्या चार ऑक्टोबरपासून राज्यातील ग्रामीण भागातील पाचवी ते 12, तर शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यातील अध्यापक विद्यालय (डीएलएड) देखील ऑफलाईन सुरु करण्यास शासनाने हिरवा कंदील दिला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील 38 डीएलएड महाविद्यालयामध्ये शासकीय कोट्यातून 476; तर मॅनेजमेंट कोट्यातून 334 प्रवेश झाले आहेत. पुढील चार दिवस प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांना संधी असल्याचे डीएलएडचे समन्वयक नारायण पडूळ यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...