आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेस सुरुवात:औरंगाबादेत 1 ते 18 वयोगटातील 8 लाख मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप होणार, 28 टक्के मुलांमध्ये आढळून येतो आतड्यांचा कृमीदोष

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत १ ते १८ वयोगटातील मुलांना जंतनाशक गोळ्या (अल्बेंडेझॉलची गोळी) देण्यात येणार आहे. मंगळवार पासून या मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. अशी माहिती जि.प. प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

जिल्हयातील ग्रामीण भागात १ ते ६ वयोगटातील २ लाख ६१ हजार ९६१ आणि ७ ते १८ वयोगटातील ५ लाख ५५ हजार ८१३ म्हणजे एकूण ८ लाख १७ हजार ७७४ मुलांचा यात समावेश आहे. आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार २८ टक्के १ ते १८ वयोगटातील मुलांमध्ये आतड्यांचा कृमीदोष आढळून येतो. परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे जंताची लागण होते. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषण हे मुख्य कारण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बालकांची शारीरिक आणि बौद्धिक वाढही यामुळे खुंटत असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी सांगितले. त्यामुळेच १ ते १८ या वयोगटातील मुलांना शाळा आणि अंगणवाडी केंद्र स्तरावर गोळ्या देण्यात येणार आहेत. याची सुरुवात मंगळवार पासून करण्यात आली आहे. तसेच शाळाबाह्य मुलांकरिता आशाताईमार्फत गोळ्या घरपोच दिल्या जातील. अब्लेंडेझॉलची गोळी उपाशीपोटी देण्यात येणार आहे. या गोळ्या खाल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. जंतांचा प्रादुर्भाव असल्याने किरकोळ पोटदुखी, जळजळ हाेणे, क्वचित प्रसंगी मुलांना उलटी होऊ शकते, त्यामुळे पालकांनी घाबरुन न जाता या गोळ्या मुलांना द्याव्यात असे आवाहन डॉ.शेकळे यांनी केले आहे.

दर सहामहिन्यांनी ही मोहिम राबविण्यात येते. १ वर्षावरील आणि १८ वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये दुषीत अन्न, पाणी तसेच शौचास आणि संडास उघड्यावर करणारी बालके, यामुळे एकापासून दुसऱ्या बालकामध्ये हे जंत होवू शकतात. यामुळे बालकांना पालकांनी जंतनाशक गोळ्या देणे आवश्यक आहे. ही मोहिम मंगळवारपासून सुरु करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील शाळा सुरु झाल्यात पण सर्व वर्ग नाहीत. तर शहरातील शाळाही बंद आहेत. त्यावर उपाय म्हणून आशाताईंच्या सहकार्याने घरपोच या गोळ्या देण्यात येतील. तर शाळेत असणाऱ्या मुलांना समोरच या गोळ्या देण्यात येतात. याबरोबरच जीवनसत्व " अ ' देखील मुलांना देण्यात येते. अशी माहिती जि.प.आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके यांनी दिली.

असे आहेत जंतनाशक गोळ्यांचे फायदे -
रक्तखय रोखतो, अन्न पचनास आणि शोषून घेण्यास सुधारणा होते.

असे आहेत जंतामुळे होणारे परिणाम -
रक्तक्षय, भूक मंदावणे, अशक्तपणा व चिडचिड, पोटदुखी, मळमळ हाेणे, उलटी, जुलाब, वजन घटने आदी.

बातम्या आणखी आहेत...