आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 वर्षांखालील मुलांत काही लक्षणे आहे का?:कुटुंबियांनी दक्ष राहुन मुलांची काळजी घेण्याच्या सुचना सर्वेक्षण पथकामार्फत द्या - शिक्षणाधिकारी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंगावर कुणीही दुखणे काढणार नाही याबद्दल दक्षता घेतल्या जाईल असे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांनी सांगितले.

शिक्षकांनी सर्वेक्षणावेळी 18 वर्षांखाली मुलांत काही लक्षणे जाणवत आहेत का याची नोंद घ्यावी. तसेच कुटुंबियांनी दक्ष राहुन मुलांची काळजी घेण्याच्या सुचना सर्वेक्षण पथकामार्फत देण्यात याव्यात जेणे करुन अंगावर कुणीही दुखणे काढणार नाही याबद्दल दक्षता घेतल्या जाईल असे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांनी सांगितले.

राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे मोठे परिणाम दिसून येत आहे. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात शहरी भागातच दिसून येत होता. परंतु आता दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात रुग्णसंख्येसह कोरोना बाधितांच्या मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत विविध उपाय योजना करण्यात येत आहे. त्यानुसार आता सर्वेक्षण पथकांची देखील आशाताई आणि अंगणवाडीताईसह मदत घेतली जात आहे.

याबरोबरच गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांसह, मयत रुग्णांचा आॅनलाईन भरण्यात येणाऱ्या माहीतीचा आढावा घ्यावा. तसेच आयएलआय सर्वेक्षणात आढळलेल्या संशयीत किती तपासणीसाठी गेले. किती तपासणीसाठी गेले नाहीत तसेच किती त्यापैकी बाधित आढळले. याची माहीती व्हाट्सअॅपच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रला पाठवावी. गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकार्यांनी दाैऱ्यावर असतांना किती टक्के काम झाले. किती टक्के अपूर्ण आहे. नोंदी भरल्या जाताहेत का आणि फिल्डवर काम करणार्यांची उपस्थितीची नोंद घ्यावी असे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांचे आदेश असल्याचे जयस्वाल यांनी पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...