आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:मुलीचा मृतदेह रिक्षात सोडून पळूनजाणारे निघाले तिचे बहीण-भाऊजी

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एमआयडीसी सिडको पोलिसांनी याप्रकरणी तपास करून तिच्या कुटुंबाचा शोध लावला.

आजारी मुलीला उपचारासाठी घेऊन जात असताना तिचा वाटेतच मृत्यू झाला. मात्र तिचा मृतदेह अाॅटाेरिक्षातच साेडून एका जोडप्याने पळ काढल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी संध्याकाळी चिकलठाण्यात घडली होती. एमआयडीसी सिडको पोलिसांनी याप्रकरणी तपास करून तिच्या कुटुंबाचा शोध लावला. रविवारी हे कुटुंब शहरात दाखल झाल्यानंतर ओळख पटली. मंगल संजू उबाळे (१४) असे मृत मुलीचे नाव आहे. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात आजाराने तिचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मृतदेह साेडून पळ काढणारे तिचे अाई-वडील नसून माेठी बहीण व भावजी असल्याचे तपासात समोर आले.

शेकटा येथील एक रिक्षाचालक (एमएच २० ईएफ ८३३५) हे १६ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास केंब्रिज चौकात एका ग्राहकाला सोडण्यासाठी गेले होते. तेथे अंदाजे दहा ते बारा वर्षांची मुलगी असलेल्या एक महिला-पुरुषाच्या जोडीने रिक्षाचालकाला थांबवले व अामची मुलगी अाजारी असून वरुड काजीच्या रुग्णालयात नेण्याची त्यांनी विनंती केली. वरुड काजी येथील एका खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर तिला घाटी रुग्णालयात घेऊन जात असताना सदर जोडप्याने चिकलठाण्यातील नॅशनल गॅरेजसमोर रिक्षा थांबवून पैसे अाणण्याचा बहाणा करत पळ काढला होता.

एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय मांटे यांनी रिक्षाचालकाच्या मदतीने मुलीची ओळख पटवण्याचे काम सुरू केले. शनिवारी त्यांनी वरुड काजी येथील खासगी रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासले. मात्र, तेव्हा त्या रिक्षाचालकाने त्याच्या मोबाइलवरून मुलीला सोडून पळालेल्या दांपत्याने एकाला कॉल करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. मांटे व त्यांच्या पथकाने त्या क्रमांकाचा शोध घेतला असता तो बुलडाण्यातील मेहकर येथील निघाला. त्याच्याशी संपर्क साधल्यानंतर मृत मुलीचे अाई-वडील रविवारी शहरात दाखल झाले. त्यांनी मृतदेह पाहून ही अामचीच मंगल असल्याचे सांगितले.

मृत मुलगी बहिणीसाेबत २० जानेवारीपासून हाेती बेपत्ता
मंगल तिची मोठी बहीण पूजा गवळी व भाऊजी दीपक गवळीसोबत २० जानेवारीपासून अचानक घरातून निघून गेली होती. तेव्हापासून हे तिघेही कुटुंबाच्या संपर्कात नव्हते. २० जानेवारी राेजी मेहकर पोलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, मृतदेह रिक्षात साेडून पळून गेलेले तिचे बहीण व भाऊजी अजूनही फरार अाहेत. पाेलिस त्यांचा शाेध घेत अाहेत.

बातम्या आणखी आहेत...