आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून 18+ लसीकरण:​​​​​​​औरंगाबादकरांचा विक्रम - दिवसभरात 30 वर्षांवरील 12,393 नागरिकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3.25 लाख जणांचे लसीकरण

कोरोनाची लस घेण्यासाठी अाता नागरिक स्वत:हून पुढे येत अाहेत. सोमवारी तब्बल १२,३९३ जणांनी लस घेतली. यापैकी सात हजार नागरिक ३० ते ४४ या वयोगटातील होते. यापूर्वी एप्रिल महिन्यात एकाच दिवशी सर्वाधिक ११ हजार जणांनी लस घेतली हाेती. शहरात २२ जूनपासून १८ वर्षांपुढील तरुणांना देखील लस देण्यात येणार आहे.

मनपाच्या ७० आरोग्य केंद्रांवर ही व्यवस्था असेल. यातील तीन केंद्रांवर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस तर ६७ आरोग्य केंद्रावर कोविशील्ड लस मिळेल. मंगळवारी १४ हजार नागरिकांना लस मिळेल अशी व्यवस्था केली आहे. प्रत्येक केंद्रावर २०० लस देण्यात येतील, अशी माहिती मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

कोविन अॅपवर नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य राहील. मात्र, सगळ्यांना कुठल्याही केंद्रावर जाऊन लस घेता येईल. मनपाकडे सध्या कोविशील्डच्या ५९ हजार तर कोव्हॅक्सिनच्या एक हजार लसी उपलब्ध आहेत.

3.५२ लाख जणांचे लसीकरण
आतापर्यंत शहरातील ३ लाख ५२ हजार २२० जणांना लस देण्यात आली. यातील ८८ हजार ३९८ जणांचे दोन्ही डोस पूर्ण झाले. अाता ११ लाख ७६ हजार ९९९ लोकांना लस देण्याचे लक्ष्य अाहे.

बातम्या आणखी आहेत...