आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:जिल्ह्यातील 40 हजार विद्यार्थ्यांचे लसीकरण, अद्याप 2 लाख 24 हजार 337 विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाकडून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या 15 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण 2 लाख 64 हजार 521 पैकी 40 हजार 184 विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील किशोरवयीन बालकांचे लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू झाले आहे.

जिल्ह्यात 15 ते 17 वयोगटातील सुमारे 2 लाख 64 हजार 521 बालके असून शुक्रवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार केवळ 40 हजार 184 बालकांचे लसीकरण झाले असून अद्याप 2 लाख 24 हजार 337 विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे.

असे आहे जिल्हयातील तालुकानिहाय लसीकरण -
- औरंगाबाद ः ------- 5208
- गंगापूर ः ---------- 1560
- कन्नड ः ----------- 8250
- खुलताबाद ः ------- 0
- पैठण ः ----------- 6072
- फुलंब्री ः ---------- 3357
- सिल्लोड ः --------- 3001
- सोयगाव ः --------- 893
- युआरसी-1 ः ------ 4986
- युआरसी-2 ः ------ 4158

बातम्या आणखी आहेत...