आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:औरंगाबाद जिल्ह्यात 2 लाखांवर नागरिकांनी घेतली लस

औरंगाबादएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • जिल्ह्यात 18+चे 12 लाख नागरिक

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असून, औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यत 2 लाख 7 हजार नागरिकांनी लस घेतली आहे. दरम्यान, नागरिकांत लस घेण्या बाबत उत्साह असला तरी जिल्ह्यात मात्र लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अद्याप 18 वर्षावरील असणाऱ्यांचे लसीकरण सुरु होवू शकले नाही राज्यात अत्यंत वेगाने पसरणाऱ्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण सर्वांत प्रभावी उपाय आहे. यानुसार जिल्ह्यात 45 वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात येत आहे. या लसीकरणाला ग्रामीण भागात नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 2 लाख 7 हजार 14 नागरिकांना लस देण्यात आली आहे.

यात 1 लाख 86 हजार 357 जणांना पहिला डोस तर 20 हजार 657 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. दरम्यान जिल्ह्यातील 51 प्राथमिक आरोग्य केंद्रात हे लसीकरण सुरू आहे. लसीकरणाची प्रक्रिया पाहता दर दिवशी 10 हजारांच्यावर अधिक नागरिकांना लस देण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यात लसीचा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यात काही लसीकरण केंद्र बंद अवस्थेत आहेत. दरम्यान नागरिक लसीकरण केंद्रात जाऊनही लस मिळत नसल्याने नागरिकात नाराजीची सुर आहे. दरम्यान जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने लाशीची मागणी करण्यात आली आहे. असे जि.प. प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात 18+चे 12 लाख नागरिक
जिल्ह्यात 18 ते 44 वर्षापुढील जवळपास 12 लाख नागरिक आहेत. यातील अनेक नागरिकांनी जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे. यात 1 मे पासुन जिल्ह्यात दरदिवशी केवळ चारशे लाभार्थ्यांना लस देण्यात येत असल्याने अनेक लाभार्थ्यी लस घेण्यासाठी वेटिंगवर आहेत. दरम्यान पुढील अठवड्याभर दरदिवशी चारशे लाभार्थ्यांना लस देण्यात येणार असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ यांनी सांगितले.

आतापर्यंत झालेली लसीकरणाची आकडेवारी -

 • पैठण- 29,928
 • गंगापूर-28,178
 • खुलताबाद-9,677
 • कन्नड -30,554
 • फुलंब्री-13,728
 • औरंगाबाद-32,620
 • सोयगाव-10,656
 • वैजापूर- 28,200
 • सिल्लोड- 23,493
 • एकूण -2,07,014
बातम्या आणखी आहेत...