आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता घराजवळच लस:पण, मोहीमेच्या तयारीसाठी मनपाचा रविवारी लसीकरणात खाडा

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोमवारपासून ११५ वॉर्डांत मोठ्या प्रमाणात लसीकरण केले जाणार

काेराेना प्रतिबंधक लसीकरणाच्या माेहिमेला वेग देण्यासाठी शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात येत अाहे. साेमवारपासून (५ मार्च) ११५ वाॅर्डांमध्ये ११५ बूथ सज्ज ठेवून जम्बाे माेहीम राबवण्याची तयारी मनपाने केली अाहे. यामुळे प्रत्येकाला अापल्या घराजवळ लसीकरणाची साेय उपलब्ध हाेईल. ही जय्यत तयारी करताना मनपाने रविवारी मात्र या माेहिमेत खाडा केला. सार्वजनिक सुटीच्या दिवशीही माेहीम थांबवू नये, असे सरकारचे अादेश असतानाही शहरात ही माेहीम बंद ठेवल्याने अनेकांना लसीकरण केंद्रावरून अाल्या पावली परत जावे लागले. रविवारी सुटीचा दिवस असल्याने लसीचा डाेस घेऊन दिवसभर अाराम करावा असा बेत अनेकांनी अाखला हाेता.

त्यासाठी शहराच्या विविध भागांतील मनपाच्या अाराेग्य केंद्रांवर सकाळी नागरिकांनी धाव घेतली. मात्र ही केंद्रे बंद असल्याचे दिसले. शहानूरमियाँ दर्गा परिसरातील राजनगर अाराेग्य केंद्रावर ‘आज लसीकरण होणार नाही’ असा बाेर्ड लावण्यात अाला हाेता. अन्य केंद्रांवर मात्र कोणत्याही प्रकारची माहिती कर्मचाऱ्यांकडून जाहीर करण्यात अाली नव्हती. केवळ रविवार सुटीचा दिवस असल्याने लसीकरण बंद केल्याची समजूत करून घेऊन नागरिकांना निराशेने परत फिरावे लागले.

पूर्वसूचना दिली नाही
‘माझ्यासह अनेक जण लस घेण्यासाठी राजनगर केंद्रावर गेले होते. तेथे लसीकरण बंद असल्याचा बोर्ड दिसला. मात्र मनपाने कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. त्यामुळे अामची निराशा झाली.’ - अनिल मुळे, मयूरबन कॉलनी

रविवारमुळे बंद
सुटीचा दिवस असताना मी घरातील कामे सोडून एन-आठच्या आरोग्य केंद्रावर गेलो. मात्र, रविवारमुळे लस देणे बंद असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. - शेषराव भालेराव, ज्येष्ठ नागरिक, शिवनेरी कॉलनी

तयारीसाठी बंद ठेवले
सोमवारपासून ११५ वॉर्डांत मोठ्या प्रमाणात लसीकरण केले जाणार अाहे. त्यामुळे कर्मचारी वर्ग व सेंटरच्या नियाेजनासाठी अाज लसीकरण बंद ठेवले. -डॉ. नीता पाडळकर, आरोग्य अधिकारी, महानगरपालिका

बातम्या आणखी आहेत...