आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:आम्ही लस घेणार, इतरांनाही सांगणार... कारण लसीकरणानेच होईल कोरोनातून सुटका

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘दिव्य मराठी’च्या आवाहनाला तरुणाईचा प्रतिसाद, विविध क्षेत्रांत झळकणाऱ्या सेलिब्रिटींचा पुढाकार

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांवर चिंतेचे सावट पसरत चालले आहे. त्यातून मुक्त होण्यासाठी सरकारने आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्ससाठी लसीकरणाची मोहीम हाती घेतली. मात्र, त्याला वयाची मर्यादा होती. आता सरकारने एक मेपासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लस देण्याची घोषणा केली आहे. भारत हा तरुणाईचा देश आहे. त्यामुळे अधिकाधिक तरुणांनी जबाबदारी स्वीकारून लस घेतल्यास देश कोरोनातून मुक्त होण्यास मदत होईल, अशी भूमिका ‘दिव्य मराठी’ने घेतली. तसे आवाहनही तरुणांना केले. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी करणाऱ्या तरुणांनी सांगितले की, आम्ही लस घेणारच. इतरांनाही लस घेण्यास सांगणार. कारण लसीकरणाने देशाची कोरोना संकटातून सुटका होणार आहे.

आता या निर्णयाचा फायदा घ्या
१ मेपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्याचा निर्णय खूपच महत्त्वाचा आहे. त्याचा सर्व तरुणांनी फायदा घ्यावा. लस घेतल्यावर आधी थोडेसे अंग दुखू शकते. काही जणांना तापही येऊ शकतो. पण त्यात घाबरण्याचे कारण नाही. लस लागू झाल्याचे ते लक्षण आहे. मी लस घेणार आहे. माझ्या मित्र-मैत्रिणींनो, तुम्हीही लस घ्या. - हंसराज जगताप, अभिनेता

युवा खेळाडूंसाठी लस महत्त्वाची
कोरोना प्रतिबंधक लस म्हणजे देशाच्या प्रगतीचा मार्ग आहे. त्यामुळे तरुणांनी लस घेणे काळाची गरज आहे. पुढे चालून आपल्याला त्याचा फायदा होईल. शिवाय आपला समाज सुरक्षित होईल. युवा खेळाडूंना पूर्वीसारखे मनसोक्त खेळण्यास मिळेल. म्हणून जबाबदारी स्वीकारा. एक मेपासून तातडीने नजीकच्या केंद्रावर जाऊन लस घ्या. - तुषार आहेर, तलवारबाजीपटू

अफवांकडे लक्ष देऊ नका
सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा देश घडवण्याची जबाबदारी आता तुमच्या-माझ्यासारख्या तरुणांवरच आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील अफवांकडे लक्ष देऊ नका. आधी लस घ्या. आमच्या फॅमिली डाॅक्टरांनी मला लस घेण्यास सांगितले आहे. त्याचे पालन मी करणार आहे. तुम्हीही लस घ्यावी, ही कळकळीची विनंती. - यशराज मुखाटे, संगीतकार

...तर लॉकडाऊनची गरज नाही
सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने वारंवार लॉकडाऊनची गरज भासत आहे. सर्वच क्षेत्रांना त्याचा फटका बसत आहे. यातून संपूर्ण देशाची सुटका करायची असेल तर तरुणाईने लस घेणे अत्यंत आवश्यक आहे. लस घेतल्याने तुम्ही आणि तुमचे आई-वडील, नातेवाईक सुरक्षित होणार हे लक्षात घ्या. लस घेतल्यावर मास्क वापरा. - नितीन कुटे, संगीत निर्माता

बातम्या आणखी आहेत...