आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्हयातील पोषण आहारास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीतील २०२१ मधील ४७ दिवसांच्या पोषण आहाराची रक्कम थेट खात्यावर डिबीटीद्वारे देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना २१० रुपये, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ३१५ रुपये खात्यावर वितरीत करण्यासाठी शाळांकडून विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या खात्याची माहिती मागवली आहे.
१ ऑगस्ट ते २८ फेब्रुवारी या दरम्यानच्या १५४ कार्यदिनाचे पोषण आहाराच्या धान्य वाटपाला पुढील दोन दिवसांत सुरुवात होईल. त्यात तांदुळ, मुगदाळ, हरभऱ्याचे वाटपाचा निर्णय घेतल्याची माहिती पोषण आहार अधीक्षक भाऊसाहेब देशपांडे यांनी बुधवारी दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी बैठकी घेतली असून, शिक्षणाधिकाऱ्यांनी देखील पहिली ते आठवीच्या शाळांमध्येही जिल्ह्यातील ३ हजार ७७ शाळांत पोषण आहार धान्य वाटपाचा निर्णय घेतला. पहिली ते पाचवी २ लाख ७२ हजार ८०५ तर सहावी ते आठवीचे १ लाख ७७ हजार ७२६ विद्यार्थी पोषण आहाराचे लाभार्थी आहेत.
पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १५ किलो ४०० ग्रॅम तांदुळ, ४ किलो मुगदाळ, ४ किलो ३०० ग्रॅम हरबरा तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना २३ किलो १०० ग्रॅम तांदूळ, ६ किलो मुगदाळ, ६ किलो ४५० ग्रॅम हरबरा वाटप करण्यात येणार आहे. त्यात शहरात सेंट्रल किचनच्या माध्यमातून जोडलेल्या ३६९ शाळा असून त्या शाळांच्या वाटपाची जबाबदारी १६ संस्थांवर आहे. मात्र, अद्याप पोषण आहार शिजवून देण्याबद्दल कोणताही निर्णय झालेला नसल्याने केवळ फेब्रुवारी अखेरपर्यंतचे धान्य वाटप होणार आहे.
असे होईल पोषण आहराचे वाटप
पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १५ किलो ४०० ग्रॅम तांदुळ, ४ किलो मुगदाळ, ४ किलो ३०० ग्रॅम हरबरा तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना २३ किलो १०० ग्रॅम तांदूळ, ६ किलो मुगदाळ, ६ किलो ४५० ग्रॅम हरबरा वाटप करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.