आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरवणी जबाबावरून गुन्हा दाखल:भावजयीला मारहाण प्रकरणी शिवसेना आमदार रमेश बोरनारेंच्या अडचणीत वाढ; विनयभंगाचा गुन्हा दाखल

वैजापुर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भावजयीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी वैजापुर तालुक्याचे शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, आता आमदार रमेश बोरनारे यांच्यावर विनयभंगाची कलम लावण्यात आली आहे. पीडित महिलेच्या पुरवणी जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका कार्यक्रमासाठी वैजापूरात आले असताना आमदार बोरनारे आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी मारहाण केल्याचा आरोप करत आमदारांच्या नात्यातील एका महिलेने वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यात सदरील महिलेने आपला विनयभंग झाला असल्याचे देखील म्हटले होते. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा पुरवणी जबाब नोंदवत वैजापूर पोलिसांनी आमदार बोरनारे यांच्यावर विनयभंगाची कलमे लावली आहेत.

पोलिस अधीक्षकांशी चर्चा करणार : चित्रा वाघ
सदरील महिलेला शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांनी मारहाण केल्यापासून, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याप्रकरणाला लावून धरले आहे. आम्ही यापूर्वीच आरोपीविरुद्ध विनयभंगाच्या कलम 354-बी सह कलम 326 चा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली होती. मात्र, राजकीय दबावाखाली जामीनपात्र कलमे लावण्यात आली. तसेच जी कलमे वाढवण्यात आली आहे. त्यावरही आपण असमाधानी असून, याबाबत पोलिस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

काय आहेत आरोप?
18 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा सत्कार कार्यक्रम होता. या कार्यक्रमात आमदार रमेश बोरनारे यांचे चुलत भाऊ आणि त्यांची पत्नींनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. भाजपच्या कार्यक्रमात उपस्थिती का लावली, या गोष्टीचा राग मनात धरत आमदार रमेश बोरनारे यांच्यासह दहा जणांनी चुलत भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केली होती.

बातम्या आणखी आहेत...