आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'माझ्या नवऱ्याची बायको...':खऱ्या आयुष्यातील 'शनाया'ला 'राधिका'ने शिकवला चांगलाच धडा, पतीच्या मैत्रिणीला महिलेने धू धू धुतले; औरंगाबादेतील व्हिडिओ व्हायरल

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पतीला त्याच्या प्रेयसीसोबत पाहून पत्नी चांगलीच संतापली.

पतीसोबत कुणी दुसरी महिला असेल तर पत्नीला कधीच सहन होत नाही. मग जर पती जर प्रेयसीसोबत बाहेर फिरत असताना पत्नीने रंगेहाथ पकडले तर मग महिलेतील रुद्रावतार जागा होतो. अशीच एक घटना औरंगाबादेत पाहायला मिळाली. प्रेयसीसोबत बाहेर फिरणाऱ्या पतीला पत्नीने रंगेहात पकडले आणि त्याच्या मैत्रिणीला भररस्त्यात धू धू धुतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पतीच्या वागण्या-बोलण्यावर या महिलेला संशय होता. यामुळेच पत्नीने पतीवर पाळत ठेवली त्याचा पाठलाग केला. पती आणि त्याची मैत्रीण कारमधून औरंगाबादच्या वरद गणेश मंदिर जवळील एका हॉटेलमध्ये जात होती. यावेळी पत्नीने या दोघांना गाठले आणि पतीच्या मैत्रिणीला धू धू धुतले. तसेच पतीलाही एक कानाखाली लगावली.

पतीला त्याच्या प्रेयसीसोबत पाहून पत्नी चांगलीच संतापली. तिने आपल्याच स्टाइलने त्याच्या मैत्रिणीला धडा शिकवला. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

बातम्या आणखी आहेत...